Altina Schinasi Cat-Eye Frame eSakal
विज्ञान-तंत्र

Google Doodle Today : स्टायलिश 'कॅट-आय' चष्म्याच्या मागे लपलेली ही महिला कोण? कुणासाठी आहे आजचं गुगल डूडल?

Harlequin Frame : या चष्म्याचा पहिला प्रोटोटाईप हा चक्क कागदी होता.

Sudesh

इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्तींना आदरांजली वाहण्यासाठी गुगलची स्वतःची विशेष शैली आहे. जगातील सर्वात मोठं इंटरनेट सर्च इंजिन असणारी ही कंपनी, एखाद्या खास व्यक्तीच्या किंवा क्षणाच्या आठवणीत आपल्या लोगोच्या जागी खास डूडल आर्ट तयार करते.

आज तुम्ही जर गुगल उघडलं, तर एक स्टायलिश चष्मा तुम्हाला दिसेल. या चष्म्याच्या काचेतून एक महिला डोकावताना दिसते आहे. ही महिला कोण आहे, आणि गुगलने आपलं डूडल तिला का समर्पित केलं आहे; याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. (Google Doodle Today)

अल्टीना शिनासी

गुगलच्या डूडलमधील ही महिला म्हणजे, अल्टीना शिनासी. (Altina Schinasi) अमेरिकी कलाकार, डिझायनर आणि इन्व्हेंटर असणाऱ्या अल्टीना यांची आज ११४वी जयंती आहे. ४ ऑगस्ट १९०७ साली न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी डिझाईन केलेल्या 'हार्लेक्विन' चष्म्याच्या फ्रेममुळे त्यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली.

न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्या पेंटिंग शिकण्यासाठी पॅरिसला गेल्या. इथूनच त्यांचा कलाविश्वातील आणि डिझायनिंगचा प्रवास सुरू झाला. साल्व्हाडोर डाली आणि जॉर्ज ग्रॉज अशा कित्येक दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केलं आहे. कला आणि डिझायनिंग क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान राहिलं. १९ ऑगस्ट १९९९ साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

कॅट-आय फ्रेम

सध्या 'कॅट-आय' फ्रेम (Cat-Eye Frame) नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या डिझाईनची आयडिया अल्टीना यांना इटलीमध्ये सुचली. इटलीच्या व्हेनिस शहरात होणाऱ्या कार्निव्हलमध्ये हार्लेक्विन मास्क (Harlequin Mask) वापरण्यात येतात. या मास्कवरुन प्रेरणा घेत अल्टीना यांनी हार्लेक्विन फ्रेमचा पहिला प्रोटोटाईप बनवला.

त्यांनी बनवलेला पहिला प्रोटोटाईप हा कागदी होता. सुरुवातीला त्यांच्या या डिझाईननुसार चष्म्याची फ्रेम बनवण्यासाठी कोणीही दुकानदार तयार होत नव्हता. अखेर, एका दुकानदाराने त्यांना संधी दिली, आणि ही फ्रेम तयार झाली.

महिलांच्या चष्म्यात क्रांती

हार्लेक्विन चष्मा येण्यापूर्वी महिलांसाठी अधिक फ्रेम ऑप्शन्स उपलब्ध नव्हते. स्टायलिश डिझाईनमुळे अल्पावधीतच ही फ्रेम भरपूर लोकप्रिय झाली. १९३० आणि ४० च्या दशकात ही फ्रेम जगभरात गाजली. याच फ्रेमला पुढे कॅट-आय फ्रेम म्हणून ओळख मिळाली. आजही चष्मा घेताना कोट्यवधी महिला अशा फ्रेमला पसंती देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT