Google Chrome Introduces Google Lens and New AI Features esakal
विज्ञान-तंत्र

Google Lense AI : गुगल लेन्समध्ये आलं AI फिचर! कसं वापरायचं? जाणून घ्या एका क्लिकवर

Google Crome New AI Feature : क्रोममध्ये गुगलच्या इन-हाउस AI मॉडेल जेमिनीचा वापर केला जात होता, परंतु ते फीचर्स फक्त पेड वर्कस्पेस सबस्क्रिप्शन घेणाऱ्यांनाच उपलब्ध होते.

Saisimran Ghashi

Google Crome AI Update : आपल्या सर्वांच्या आवडत्या आणि दैनंदिन वापराच्या गुगल क्रोम ब्राउजरमध्ये आता आणखी काही जबरदस्त AI-आधारित फीचर्स समाविष्ट करण्यात आल्याची घोषणा गुगलने केली आहे. यापूर्वी क्रोममध्ये गुगलच्या इन-हाउस AI मॉडेल जेमिनीचा वापर केला जात होता, परंतु ते फीचर्स फक्त पेड वर्कस्पेस सबस्क्रिप्शन घेणाऱ्यांनाच उपलब्ध होते. आता मात्र, सर्वसामान्य वापरकर्ते देखील या नवीन AI फीचर्सचा वापर करू शकतात.

या नवीन फीचर्समध्ये गुगल लेन्सचा समावेश आहे. तसेच, तुमच्या भाषेत प्रश्न विचारून ब्राउझर हिस्ट्रीमध्ये शोध करता येणारे AI-आधारित फीचर आणि वेगवेगळ्या वेबसाइटवरच्या उत्पादनांची तुलना करण्याची सोय देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

गुगल क्रोममध्ये आलेली नवीन AI फीचर्स

गुगल लेन्सचा समावेश: आता तुमच्या डेस्कटॉप ब्राउजरवर देखील तुम्ही गुगल लेन्सचा वापर करू शकता. एखाद्या वेब पेजवरचा मजकूर किंवा प्रतिमा हायलाइट करून त्यावरून तुम्ही थेट माहिती शोधू शकता. उदाहरणार्थ, एखाद्या कपड्याची प्रतिमा हायलाइट केल्यावर त्याचं डिझाईन, किंमत आणि इतर ब्रँड्समध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायांची माहिती तुम्हाला मिळू शकेल.

टॅब कंपेअर फीचर: ऑनलाइन शॉपिंग करताना हा फीचर तुमच्या खूप कामी येईल. वेगवेगळ्या टॅबमध्ये असलेल्या उत्पादनांची माहिती एकत्रित करून त्यांची तुलनात्मक माहिती एकाच ठिकाणी दाखवणारे हे फीचर आहे. त्यामुळे तुम्हाला किंमत, फीचर्स, स्पेसिफिकेशन्स यांची तुलना करणे सोपे जाईल.

AI-आधारित ब्राउझर हिस्ट्री: आता तुम्हाला नक्की काय शोधायचंय ते आठवत नसल्यास काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या भाषेत प्रश्न विचारून जसे की, "गेल्या आठवड्यात मी कोणत्या शॉपिंग वेबसाइटवर गेले होते ?" असा प्रश्न विचारला की, क्रोम तुमच्या ब्राउझर हिस्ट्रीमधून संबंधित वेबसाइट शोधून काढेल.

हे सर्व फीचर्स सुरुवातीला अमेरिकेत रोलआउट केले जात आहेत. पण येत्या काही आठवड्यांत भारतात देखील उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे. या नवीन AI फीचर्समुळे गुगल क्रोम आणखी स्मार्ट आणि वापरकर्ते खुश होणार आहेत यात शंका नाही. तुमच्या ब्राउझिंग अनुभवात चांगली भर घालण्यासाठी तुम्हीही या फीचर्सचा वापर करून पाहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : निलेश घायवळच्या अडचणी वाढणार? आणखी एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता...

Nanded Dasara: नांदेडमध्ये दसरा महोत्सव उत्साहात; हल्ला-महल्ला मिरवणुकीत हजारो शीख भाविकांचा सहभाग

Pune Crime : टीव्ही बंद करायला सांगितला म्हणून केली वडिलांची हत्या; ऐन सणाच्या दिवशी घडलेल्या घटनेने कोथरुड मध्ये खळबळ

Teacher Recruitment: मराठवाड्यात शिक्षकांसाठी सुवर्णसंधी! ४५७ समन्वयक पदांसाठी ऑनलाइन परीक्षा १ ते ५ डिसेंबर

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; आता E-kyc केलेल्या बहिणींनाच मिळणार लाभ, दिवाळीतील हप्ता पडणार लांबणीवर

SCROLL FOR NEXT