Google Doodle Election
Google Doodle Election eSakal
विज्ञान-तंत्र

Google Doodle : लोकशाहीच्या उत्सवात गुगलचाही सहभाग; मतदानाच्या निमित्ताने तयार केलं खास डूडल

Sudesh

Google Doodle Today : एखाद्या खास दिवसानिमित्त गुगल नेहमीच आपल्या डूडलच्या माध्यमातून शुभेच्छा देत असतं. आजपासून देशातील लोकसभा निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात होत आहे. यानिमित्ताने देखील गुगल इंडियाने एक खास डूडल तयार केलं आहे.

आजच्या गुगल डूडलमध्ये मतदान करतानाचा एक हात दिसत आहे. या हाताच्या पहिल्या बोटावर शाई देखील दिसत आहे. यामधून लोकांना मतदान करण्यासाठी प्रेरित केलं जात आहे. या डूडलवर क्लिक केल्यानंतर 2024 India Elections या पेजवर रीडायरेक्ट होत आहे. याठिकाणी निवडणुकीसंदर्भात लेटेस्ट अपडेट्स पहायला मिळत आहेत.

लोकसभा निवडणूक

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आजपासून सुरू झालं आहे. आज 21 राज्यांमधील 102 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रात विदर्भातील पाच मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स हँडलवरुन मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. प्रत्येक मत महत्त्वाचं असून, तरुण मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून आपला हक्क बजावावा असं पंतप्रधान म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah: बहुमत न मिळाल्यास भाजपचा प्लॅन बी काय आहे? अमित शाह काय म्हणाले जाणून घ्या...

IPL 2024: हैदराबादनेही प्लेऑफचं तिकीट केलं पक्कं! आता RCB vs CSK सामना लावणार चौथ्या संघाचा निकाल, पाहा कसं आहे समीकरण

Devendra Fadanvis: लोकसभेनंतर आता फडणवीसांनी सांगितलं विधानसभेचं गणित; मुख्यमंत्रीपदाबाबत केलं मोठं वक्तव्य

Char Dham Yatra 2024: सावधान नाहीतर रीलच्या नादात जाल जेलमध्ये...उत्तराखंड सरकारने घेतला मोठा निर्णय, अधिकारी तळ ठोकून

Nepal Bans: आता नेपाळनेही MDH, EVEREST मसाल्यांवर केली मोठी कारवाई; आयात आणि विक्रीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT