Google Flights cheapest filters  esakal
विज्ञान-तंत्र

Flights in Diwali : दिवाळीला घरी जायचंय? विमानाने प्रवास होणार स्वस्त; गुगलचं Cheapest फीचर कसं वापरायचं? बघाच

google flights new booking tool cheaper flights : गुगल फ्लाइट्सने 'Cheapest' नावाची नवीन सर्च फिल्टर सुविधा जाहीर केली आहे.

Saisimran Ghashi

Google Flights Cheapest Filter : गुगलने आपल्या युजर्ससाठी स्वस्तात विमान प्रवासाची सोय आणली आहे. सणासुदीच्या काळात दिवाळीत प्रवाशांना कमी खर्चात प्रवासाची सुविधा मिळावी यासाठी गुगल फ्लाइट्सने 'Cheapest' नावाची नवीन सर्च फिल्टर सुविधा जाहीर केली आहे. यामुळे प्रवाशांना आता विमान प्रवासाचे स्वस्त पर्याय शोधणे आणखी सोपे होणार आहे. या नवीन फीचरमुळे आता गुगल फ्लाइट्सवर ‘Best’ आणि ‘Cheapest’ असे दोन पर्याय उपलब्ध असतील, ज्यातून युजर्स त्यांच्या सोयीने प्रवासाचे तिकीट बुक करू शकतील.

नवीन 'Cheapest' सर्च फिल्टरमुळे प्रवाशांना किफायतशीर प्रवासाची संधी मिळेल. गुगलने याला 'क्रिएटिव्ह आयटिनेररीज' असे संबोधले आहे, जे प्रवाशांना पारंपरिक प्रवास योजनांपेक्षा वेगवेगळे आणि स्वस्त पर्याय शोधण्याची संधी देते. हे स्वस्त पर्याय ओळखण्यासाठी त्यांच्या किंमती हिरव्या रंगात दर्शविल्या जातील. त्यामुळे कमी किमतीत प्रवास करायचा असल्यास हे पर्याय सहज दिसतील.

स्वस्त दर मिळविण्यासाठी लांबचा थांबा असणाऱ्या फ्लाइट्सचा वापर केला जाऊ शकतो. यामध्ये 'सेल्फ ट्रान्स्फर' सारख्या संकल्पना देखील लागू होऊ शकतात, ज्यात प्रवाशांना आपले सामान स्वतःच गोळा करून पुढील फ्लाइटसाठी पुन्हा चेक इन करावे लागते.

एकाच फ्लाइटमध्ये ट्रान्स्फर होण्याऐवजी, वेगवेगळ्या फ्लाइट्स बुक केल्यास या प्रकारच्या पर्यायांमधून बऱ्याच वेळा स्वस्त दर मिळू शकतो. गुगल फ्लाइट्स युजर्सना त्यांच्या प्रवासाच्या इटिनेररीमध्ये महत्वाच्या सूचना दर्शवू लागले आहेत. प्रवाशांनी वेगवेगळ्या फ्लाइट्स बुक केल्यास "Separate tickets booked together" अशा सूचनाही देण्यात येतील. अशा प्रकारच्या प्रवासात युजर्सना अतिरिक्त काळजी घेण्याची आवश्यकता असू शकते, त्यामुळे रेड वार्निंग मॅसेजसुद्धा देण्यात येईल, ज्यामुळे संभाव्य धोके लक्षात येतील.

हा नवीन 'Cheapest' पर्याय पुढील दोन आठवड्यांत सर्व युजर्ससाठी जागतिक स्तरावर उपलब्ध होईल. कमी खर्चात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे, कारण ती विशेषतः खर्चावर नियंत्रण ठेवणाऱ्यांसाठी तयार केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT