Google Gemini Live Feature : गूगलच्या वार्षिक Google I/O 2025 या डेव्हलपर परिषदेच्या निमित्ताने कंपनीने आपल्या अत्याधुनिक AI प्रणाली Gemini मध्ये मोठे अपडेट्स जाहीर केले आहेत. यामध्ये सर्वाधिक लक्ष वेधणारी बाब म्हणजे Gemini Live हे नवे फिचर जे वापरकर्त्याला त्यांच्या स्मार्टफोनसोबत अगदी माणसासारखा संवाद साधण्याची संधी देते.
ही नवी तंत्रज्ञानाची झेप केवळ महागड्या हायएंड फोनसाठीच मर्यादित नाही, तर सामान्य स्मार्टफोन वापरकर्तेही याचा सहज लाभ घेऊ शकतात. Gemini Live फिचरमुळे तुम्ही फोनशी अगदी बोलत असल्यासारखं वाटेल तुमच्या प्रश्नांना तो उत्तर देईल, सल्ला देईल आणि तुमच्या दैनंदिन कामात मदत करेल.
हे नवे फिचर Project Astra या गूगलच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा भाग आहे, ज्याची झलक कंपनीने गेल्या वर्षी पहिल्यांदा दाखवली होती. Gemini Live हे आता आणखी परिपक्व झाले असून, त्याचा वापर Google Calendar, Keep Notes, Tasks, आणि Maps सारख्या अॅप्समध्ये थेट करता येणार आहे.
उदाहरणार्थ, तुम्ही आपल्या फोनचा कॅमेरा एखाद्या गोष्टीकडे फिरवलात, तर Gemini Live त्याची माहिती तुम्हाला त्वरित देऊ शकते अगदी तुम्ही त्या वस्तूवर टॅप करताच. तसंच, तुम्हाला एखादी मीटिंग शेड्यूल करायची असेल, एखादा रिमाइंडर सेट करायचा असेल किंवा रस्ता शोधायचा असेल, तर फक्त बोलून किंवा दाखवून हे सर्व शक्य होणार आहे.
Gemini Live वापरण्यासाठी सर्वप्रथम Google Gemini अॅप तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड करा. हे अॅप Google Play Store आणि Apple App Store वर उपलब्ध आहे.
अॅप डाऊनलोड झाल्यानंतर आवश्यक परवानग्या (permissions) द्या.
त्यानंतर अॅप उघडा आणि माइकच्या शेजारी असलेले Gemini Live आयकॉन टॅप करा.
कॅमेरा वापरण्यासाठी, खालील बाजूला असलेला कॅमेरा आयकॉन टॅप करा.
तुमच्या सभोवतालच्या वस्तूंवर कॅमेरा फिरवा, आणि स्क्रीनवर टॅप करताच तुमचा फोन त्या गोष्टीबद्दल माहिती देईल
हे लक्षात ठेवा की Gemini Live चा उपयोग करताना तुमच्या फोनला इंटरनेटशी जोडलेले असणे आवश्यक आहे, कारण तो ऑनलाईन डेटावरून माहिती घेतो.
Gemini Live हे फिचर AI च्या पुढच्या पायरीकडे आपल्याला घेऊन जाते, जिथे आपला फोन केवळ एक डिव्हाइस न राहता, एक संवादक्षम डिजिटल सहकारी बनतो. हे तंत्रज्ञान भविष्यातील मोबाईल अनुभवाची सुरुवात असल्याचे गूगलचे म्हणणे आहे. तुम्ही अजून प्रयत्न केला नाही का? मग आजच डाउनलोड करा Gemini अॅप आणि अनुभव घ्या स्मार्टफोनच्या नव्या युगाचा!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.