google meet feature 
विज्ञान-तंत्र

Google Meet वर आले नवीन फिचर्स! मिटींग होणार आणखी मस्त

सकाळ डिजिटल टीम

जगभरात कोरोनाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे बर्‍याच आपल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसमध्ये बोलवत आहेत. तर काहींचे अजून घरूनच काम सुरू आहे. असे असले तरी ऑफिसच्या मिटींग्स या कुणालाच चुकलेल्या नाहीत. कोरोना काळात ऑफिसच्या मिटिंग्स झूम, गुगल मिट वर होत होत्या. त्यासाठी आता Google ने Google Meet वर एक प्रमुख अपडेट दिले आहे, ज्याचा उद्देश ऑफिसला जाणाऱ्यांना त्यांचे दैनंदिन कामात मदत करणे आणि कामाचे व्यवस्थापन सोपे करणे आहे.

Google Meet Marathi News

इन मिटिंग रिएक्शन - मीटिंगमधील प्रतिक्रिया

या अपडेटचा एक भाग म्हणून, Google Meet इन-मीटिंग रिएक्शन हा पर्याय आणते आहे. मीटिंगमध्ये Google Meet वापरकर्त्यांना प्रतिसाद देण्यासाठी किंवा इतर सहभागींना त्यांच्या कमेंट्स देण्याचा मार्ग म्हणून थंब्स अप, हार्ट, मोठ्याने हसणे, थंब्स डाउन, सरप्राईज आणि टाळ्या असे निवडक इमोजी वापरण्यासाठी मिळणार आहेत. कंपनीने गुगल मीटवर कमेंटसाठी स्क्रीनशॉट शेअऱ केला आहे. त्यानुसार युझर्स सेटिंग्ज मेनू वापरून हे इमोजी बदलू शकतात, जे या इमोजींच्या पुढे दिसतील, जेव्हा युझर्स मीटिंगमध्ये असतील तेव्हा स्क्रीन शेअरिंग बटण त्याच्या शेजारी दिसणार आहे. त्यासाठी घड्याळाच्या आयकॉनवर क्लिक करायचे आहे. कंपनीच्या मते, लोकांच्या प्रतिक्रिया व्हिडिओ टाइलमध्ये दिसतील किंवा त्यांची व्हिडिओ टाइल दिसत नसल्यास त्यांच्या नावाने ओव्हरफ्लो होईल आणि त्या लवकरच वापरासाठी उपलब्ध होतील.

पिक्चर-इन-पिक्चर मोड (पीआयपी मोड)

Google मीटमध्ये Google पिक्चर-इन-पिक्चर मोड (पीआयपी मोड) हा नवीन पर्याय देणार आहे.. एका ब्लॉग पोस्टमध्ये, Google ने Chrome ब्राउझरवर मीटमध्ये पिक्चर-इन-पिक्चर आणत असल्याचे सांगितले. प्रेझेंटर्स आणि मल्टीटास्कर्सना वेगवेगळ्या टॅब आणि विंडोमधून नेव्हिगेट करताना हे पाहण्यास मदत मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT