Background Change AI Feature in Google Meet esakal
विज्ञान-तंत्र

Google Meet AI Feature: Google Meet मध्ये आलय 'हे' नवीन एआय फिचर

Artificial Intelligence : मीटिंगमध्ये करू शकणार बॅकग्राऊंडमध्ये बदल आणि बरच काही

सकाळ डिजिटल टीम

Google Meet : आजकाल व्हिडीओ कॉल,गुगल मीट, झूम मीटचा जमाना आहे. लोक आपल्या प्रियजनांशी बोलण्यासाठी, ऑफिस मध्ये संपर्क साधण्यासाठी आणि अन्य बऱ्याच कामांसाठी गुगल मीट चा वापर करतात. अश्यात जर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये तुमचे बॅकग्राऊंड चांगले नसेल किंवा अन्य काही अडचणी असतील तर आता कृत्रिम बुद्धिमत्ता तुम्हाला मदत करु शकणार आहे. च्या मदतीने तुमची व्हिडीओ मीट प्लॅटफॉर्मवरचा तुमचा अनुभव सुधारायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

गुगल मीटमध्ये आता एक नवीन 'बीट' फीचर आले आहे. याचा वापर करून एआयच्या मदतीने यूजर कस्टम बॅकग्राउंड तयार करू शकतात. AI च्या मदतीने Google Meet मध्ये पार्श्वभूमी, फोटो तयार केला जाऊ शकतो. Google Meet पण हे बीट फिचर आत्ता फक्त कॉम्प्युटरवर उपलब्ध आहे. हे फीचर अजून स्मार्टफोन्सवर लाँच करण्यात आलेले नाही. हे फिचर वापरण्यासाठी, वापरकर्त्याला Google Workspace लॅबमध्ये लॉगिन असणे आवश्यक आहे.

Google Meet वर AI वैशिष्ट्ये वापरून व्हिडिओ कॉल सुधारता येतात. पुढे जाणून घ्या काय आहे ही संपूर्ण प्रक्रिया.

सर्व प्रथम, वापरकर्त्याला संगणकाच्या वेब ब्राउझरमध्ये Google Meet उघडावे लागेल.

यानंतर तुम्हाला मीटिंगमध्ये सहभागी व्हावे लागेल किंवा तुमची नवीन मीटिंग सुरू करावी लागेल.

Google Meet उघडल्यानंतर, तुमच्या व्ह्यू विंडोमध्ये तीन उभ्या ठिपक्यांवर क्लिक करा. त्यानंतर मेनूवर जाऊन Apply Visual Effect वर क्लिक करा.

Google Meet मध्ये, पार्श्वभूमी फोटोसाठी तुम्हाला थोडा कन्टेन्ट टाईप करावा लागेल. येथे वापरकर्त्याने हे लक्षात ठेवले पाहिजे की फोटो देखील वर्णनाप्रमाणेच असेल. त्यामुळे तुमचं क्रिएटिव्ह माईंड वापरून कसा बॅकग्राऊंड हवा त्याबद्दल माहिती द्या.ज्यामध्ये तुम्ही समुद्रकिनारा,मोठा फ्लॅट,गार्डन असा पर्याय देखील निवडू शकता.

प्रॉम्प्ट बॉक्सच्या खाली स्टाईल निवडण्याचा पर्याय असेल, येथून तुम्हाला बॅकग्राउंड फोटोसाठी स्टाईल निवडावी लागेल. यात क्लासिक आणि आधुनिक समाविष्ट आहे. तुम्हाला जसे बॅकग्राऊंड हवे आहे त्याप्रमाने तुम्ही पर्याय निवडू शकता.

अश्या काही सोप्या स्टेप्स वापरून तुम्ही तुमच्या Google Meet वरील अनुभव अधिकाधिक सुधारू शकता. आता प्रत्येक क्षेत्रात AI चा वापर होत आहे. त्यामुळे गुगल मीट मध्ये देखील आले हे नवीन फिचर नक्कीच वापरकर्त्यांसाठी फायद्याचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Khandala Accident : खंडाळा घाटात भीषण अपघात; भरधाव टेम्पोचे नियंत्रण सुटले; ५ वाहनांना धडक; ट्रॅफिक अर्धा तास ठप्प!

Bharat Taxi Cab Service : ‘ओला-उबर’ला मिळणार जबरदस्त टक्कर!, देशभरात आजपासून ‘भारत टॅक्सी’ कॅब सेवा सुरू

New York: न्यूयॉर्क शहराला मिळाला पहिला मुस्लिम महापौर; कुराण हातात घेऊन घेतली शपथ

SCROLL FOR NEXT