Google Messages UI Update eSakal
विज्ञान-तंत्र

Google Messages : 'गुगल मेसेज'मध्ये मिळणार कामाचं फीचर! आता मेसेज कॉपी-पेस्ट करायची गरज नाही

Google new Feature : गुगलने आपल्या मेसेज अ‍ॅपला जुलैमध्ये अपग्रेड केलं होतं.

Sudesh

जगभरातील कित्येक यूजर्स टेक्स्ट मेसेजिंगसाठी गुगल मेसेज या अ‍ॅपचा वापर करतात. या सर्व यूजर्ससाठी एक मोठी बातमी आहे. गुगलने या अ‍ॅपचं यूआय पुन्हा एकदा अपडेट केलं आहे. यामुळे आता यूजर्सना एक अगदी फायद्याचं फीचर मिळणार आहे.

गुगलने आपल्या मेसेज अ‍ॅपला जुलैमध्ये अपग्रेड केलं होतं. यावेळी अ‍ॅपच्या यूजर इंटरफेसमध्ये मोठे बदल करण्यात आले होते. या अ‍ॅपची संपूर्ण होम स्क्रीन रीडिझाईन करण्यात आली होती. यामध्ये नेव्हिगेशन ड्रॉवर काढून टाकण्यात आला होता, आणि सर्च फिल्टरही अपडेट करण्यात आले होते.

आता गुगलने या अ‍ॅपमध्ये आणखी एक मोठा बदल केला आहे. नुकत्याच अपडेट करण्यात आलेल्या यूआयमध्ये यूजर्स मल्टिपल कॉन्टॅक्ट्सना एकाच वेळी मेसेज पाठवू शकणार आहेत. यामुळे एकच मेसेज अनेक व्यक्तींना पाठवण्यासाठी आता कॉपी-पेस्ट करत बसण्याची गरज भासणार नाही.

9to5Google या वेबसाईटने याबाबत माहिती दिली आहे. हे फीचर टेक्स्ट मेसेज, आरसीएस चॅट, फोटो किंवा इतर मेसेजसाठी वापरता येऊ शकतं. यासाठी तुम्हाला केवळ संबंधित मेसेजवर लाँग प्रेस कराायचं आहे. यानंतर एक पॉपअप मेन्यू येईल. यातील पर्यायांमधील 'फॉरवर्ड' हा पर्याय सिलेक्ट करुन तुम्ही मल्टिपल अकाउंट्सना तो मेसेज पाठवू शकाल.

हे फीचर टप्प्याटप्प्याने लाँच करण्यात येत असून, लवकरच ते जगभरातील यूजर्सना वापरता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG सिलिंडर पुन्हा महागणार! केंद्र सरकारचे संकेत, वाढीमागचं कारणही स्पष्ट सांगितलं

Pune Water Cuts: खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा घटला; पुण्यात सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा

Health Workers: राज्यात ४,१९३ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या, समुपदेशनाद्वारे प्रक्रिया

Baramati News : उपमुख्यमंत्र्यांची शासकीय वैदयकीय महाविद्यालयात सरप्राईज व्हिजिट आणि प्रशासनाची पळापळ....

Mumbai Strike: टँकर चालकांचा संप, बेस्टचाही आंदोलनाचा इशारा, उष्णतेचा तडाखा... मुंबईकरांवर ट्रिपल संकट; चिंता वाढली

SCROLL FOR NEXT