विज्ञान-तंत्र

गुगलवर तयार करा व्हर्च्युअल कार्ड, नाव सर्च करताच मिळेल तुमची माहिती

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - गुगलने काही दिवसांपूर्वी भारतात पिपल कार्ड्स ही सेवा सुरू केली आहे. गुगलच्या या फीचरचा वापर करून युजर्सना त्यांचे व्हर्च्युअल व्हिजिटिंग कार्ड तयार करता येईल. यामध्ये युजर्सना त्यांची वेबसाईट, सोशल मीडिया हँडल आणि इतर माहिती सहज शेअर करता येणार आहे. गुगलच्या पिपल कार्ड्स फीचरमुळे लोकांना गुगलवर शोधणंही सोपं होणार आहे. व्हर्च्युअल कार्ड कसं तयार करायचं आणि त्याचा वापर कसा करायचा याची माहिती आपण घेणार आहे. 

पिपल कार्ड्स तयार करायचं असेल तर तुमचे गुगलवर अकाउंट असायला हवे. या अकाउंटच्या मदतीने गुगलवर तुमचं नाव सर्च केल्यानंतर पिपल कार्ड्सची माहिती युजरला दिली जाईल. यासोबतच पिपल कार्ड्स तयार करण्यासाठी तुमचा संपर्क क्रमांकही द्यावा लागेल. 

सध्या गुगलने त्यांची पिपल कार्ड्स सेवा ही फक्त मोबाईल युजर्ससाठी सुरू ठेवली आहे. तसंच सध्या ही सेवा इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. गुगल लवकरच या सेवेला इतर भाषांमध्ये आणि सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे.

टेक्नॉलॉजीच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पिपल कार्ड तयार करण्यासाठी सर्वात आधी गुगल अकाउंटमध्ये साइन करा. त्यानंतर Add me to search असं सर्च करा. त्यानंतर तुम्हाला Add yourself to google Search पर्याय मिळेल. तो निवडल्यानंतर तुमचा फोन नंबर विचारला जाईल. त्यावर 6 अंकी व्हेरिफिकेशन कोड पाठवला जातो तो एटर केल्यानंतर गुगल तुम्हाला एक फॉर्म देते. यामध्ये तुम्हाला पब्लिक प्रोफाइल तयार करण्यासाठी आवश्यक अशा प्रकारची माहिती द्यावी लागते. यामध्ये तुमचं काम, शिक्षण याशिवाय इतर गोष्टींची माहिती देता येते. 

गुगलने असं म्हटलं आहे की, या सेवेमुळे सर्वांना योग्य आणि खरी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सेवेमुळे फेक युजर, भाषा आणि लो क्वालिटी कंटेंट ओळखण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT