Photomath App Google eSakal
विज्ञान-तंत्र

Photomath App : गणिताचे प्रश्न सोडवण्यासाठी गुगलने आणलं खास अ‍ॅप; फक्त स्कॅन करून मिळेल चुटकीसरशी उत्तर

Google Maths App : हे अ‍ॅप गुगलच्या प्ले-स्टोअर आणि अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. गुगलने या कंपनीला 2022 साली अक्वायर केलं होतं.

Sudesh

Google App for solving Math : गणित म्हटलं की कित्येक जणांना अजूनही दरारून घाम फुटतो. गुगलवर शक्यतो सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात, मात्र पुस्तकातील किंवा वहीमध्ये लिहिलेल्या गणिताच्या प्रश्नांना गुगलवर सर्च करणं हे अगदीच किचकट काम आहे. यामुळेच गुगलने आता खास गणिते सोडवण्यासाठी नवं अ‍ॅप लाँच केलं आहे. फोटोमॅथ असं या अ‍ॅपचं नाव आहे.

Photomath हे अ‍ॅप गुगलच्या प्ले-स्टोअर आणि अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. गुगलने या कंपनीला 2022 साली अक्वायर केलं होतं. विद्यार्थ्यांना लर्निंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी मदत करणारं हे अ‍ॅप आता अँड्रॉईड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

कसं काम करतं हे अ‍ॅप?

नावातच दिल्याप्रमाणे, या अ‍ॅपवर जेव्हा तुम्ही एखाद्या गणिताचा फोटो काढून अपलोड कराल; तेव्हा ते या प्रश्नाचं स्टेप-बाय-स्टेप सोल्यूशन तुम्हाला स्क्रीनवर दाखवतं. वर्ड प्रॉब्लेम, इक्वेशन, ट्रिग्नोमॅट्री, कॅल्क्युलस अशा कित्येक प्रकारच्या गणितांना हे अ‍ॅप आरामात सोडवू शकतं. (How Photomath App works)

केवळ फोटोच्या स्वरुपातच नाही, तर मॅन्युअली देखील यामध्ये गणिताचे प्रॉब्लेम एंटर करू शकता. एखादं गणित एकापेक्षा अधिक प्रकारे सोडवता येत असेल, तर त्याबाबत देखील हे अ‍ॅप माहिती देऊ शकतं. गणिताचा फोटो अपलोड करताना तो स्पष्ट असावा, तसंच प्रश्नातील एखादा भाग कट होणार नाही याची खबरदारी घेणं गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Doctor killed in Tilari : आंध्रप्रदेशातील डॉक्टरचा तिलारीच्या जंगलात खून! दरीत मोटार फेकली; खुनामागचं कारण...

AUS vs IND: रोहित...कोहली... चाहत्यांचा जयघोष! सिडनी वनडेपूर्वी अन् नंतर कसं होतं संपूर्ण वातावरण, BCCI ने शेअर केला Video

Latest Marathi News Live Update : मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासमोरच राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाची चव्हाट्यावर

अप्पीला मिळाला तिचा रियल लाईफ अर्जुन ! आज पार पडला साखरपुडा; निवेदिता सराफांची खास हजेरी

रील्स प्रेमींसाठी खुशखबर! Instagram ने लॉन्च केलं मजेदार फीचर, आधी बघितलेली कोणतीही रील सेकंदात सापडणार, काय आहे Watch History सेटिंग?

SCROLL FOR NEXT