Google Pixel 7 Mobile Phone Sakal
विज्ञान-तंत्र

Google च्या या फोनवर मिळतोय १२ हजारांहून अधिक डिस्काऊंट; ५० मेगापिक्सेल कॅमेरा, 8GB RAM अन् बरंच काही मिळेल...

पण ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. काय आहे ही ऑफर आणि कशी घेता येईल, जाणून घ्या...

वैष्णवी कारंजकर

फ्लिपकार्टवर सध्या Big Saving Days सेल सुरू आहे. हा सेल ९ ऑगस्ट रोजी संपणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोनपासून लॅपटॉपपर्यंत तसंच इतरही अनेक प्रोडक्ट्सवर जबरदस्त डिस्काऊंट मिळत आहे. आज अशाच एका स्पेशल डिलबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यामध्ये एक मोबाईल हँडसेटवर १२ हजारांहूनही अधिक डिस्काऊंट मिळणार आहे.

Google Pixel 7 हा मोबाईल फोन खूपच कमी किमतीत खरेदी करता येणार आहे. फ्लिपकार्टवर हा फोन फक्त ४७,९९९ रुपयांमध्ये मिळणार आहे. हा मोबाईल लाँच करताना त्याची किंमत होती ५९,९९९ हेही लक्षात घ्यायला हवं. या व्हेरिएंटमध्ये 8GB RAM आणि 128 GB इंटर्नल स्टोरेज मिळणार आहे.

Google Pixel 7 वर आहेत अनेक बँक ऑफर्स

फ्लिपकार्टवर पाहाल तर Google Pixel 7 47,999 रुपयांमध्ये मिळत आहे. पण यापेक्षाही चांगली ऑफर या फोनवर आहे. या ऑफरमध्ये काही बँक ऑफर्सही आहेत. या ऑफरचा लाभ घेऊन युजर्सला आणखी २००० रुपयांचा फायदा मिळू शकतो. तसंच जुना फोन बदलला तर फोनची किंमत आणखी कमी होऊ शकते.

Google Pixel 7 ची वैशिष्ट्ये

Google Pixel 7 मध्ये ६.३ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. यामध्ये एक छोटा पंच होल कटआऊटही आहे. यामध्ये सेल्फी कॅमेराही बसलेला आहे. या हँडसेटमध्ये ४२७० mAh बॅटरी आहे. तर यामध्ये Google Tensor G2 प्रोसेसर बसवलेला आहे, यामुळे हा फोन अगदी स्मूद चालतो.

Google Pixel 7 चा कॅमेरा सेटअप

Google Pixel 7 च्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये बॅक पॅनेलवर ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. प्रायमरी कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा आहे, तर सेकंडरी कॅमेरा १२ मेगा पिक्सेल आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १०.८ मेगा पिक्सेलचा फ्रंट कॅमेराही आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 1st ODI : यशस्वी जैस्वाल OUT, रिषभ पंतला स्थान नाही! हर्षित राणा खेळणार; पहिल्या वन डे साठी Playing XI अशी असणार...

Ambarnath Election: अंबरनाथमध्ये शिंदेंनी भाजपचं स्वप्न धुळीस मिळवलं; काँग्रेसला सोबत घेतलेल्या भाजपचं काय?

Tribal Development Scam : आदिवासी विकास निधीवर डल्ला; घोडेगावमध्ये ३१ लाखांच्या शासकीय निधी अपहारप्रकरणी गुन्हा दाखल!

Budget Session 2026: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ जानेवारी पासून सुरू होणार; तारखा जाहीर

Winter Hot Shower Risks: आरामदायक वाटणारी गरम पाण्याची आंघोळ तुमची त्वचा हळूहळू खराब करतेय का? तज्ज्ञांनी सांगितले धोके

SCROLL FOR NEXT