Google Pixel 8 Price eSakal
विज्ञान-तंत्र

Pixel 8 India Price : 'पिक्सेल 8' अन् 'पिक्सेल 8 प्रो' लाँच, भारतात किती आहे किंमत अन् डिस्काउंट? जाणून घ्या

Google Pixel 8 : या स्मार्टफोनची बुकिंग सुरू झाली असून, पुढील आठवड्यांपासून शिपिंग करण्यात येणार आहे.

Sudesh

गुगलच्या पिक्सेल सीरीजमधील नवीन स्मार्टफोन आज लाँच करण्यात आले. मेड बाय गुगल या इव्हेंटमध्ये Google Pixel 8 आणि Google Pixel 8 Pro या स्मार्टफोनची घोषणा करण्यात आली. या स्मार्टफोनची बुकिंग सुरू झाली असून, पुढील आठवड्यांपासून शिपिंग करण्यात येणार आहे.

भारतात किती किंमत?

गुगल पिक्सेल 8 फोनच्या बेस मॉडेलची (8GB+128GB) किंमत 75,999 रुपये आहे. तर, 8GB+256GB व्हेरियंटची किंमत 82,999 आहे. पिक्सेल 8 प्रो फोनची किंमत (12GB+128GB) 1,06,999 रुपये आहे.

किती मिळतोय डिस्काउंट?

सध्या फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईटवर पिक्सेल 8 आणि पिक्सेल 8 प्रो या दोन्ही स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. Pixel 8 वर तीन हजार रुपयांचा एक्स्चेंज डिस्काउंट देण्यात येत आहे. तर, सोबतच 8,000 रुपयांचा बँक डिस्काउंट देखील मिळत आहे. यानंतर पिक्सेल 8 च्या बेस मॉडेलची इफेक्टिव्ह किंमत फ्लिपकार्टवर 64,999 रुपये होत आहे.

Pixel 8 Pro स्मार्टफोनच्या बेस मॉडेलवर चार हजार रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट मिळत आहे. सोबतच, 9,000 रुपयांचा बँक डिस्काउंट देखील मिळत आहे. यानंतर पिक्सेल 8 प्रो च्या बेस मॉडेलची इफेक्टिव्ह किंमत फ्लिपकार्टवर 93,999 रुपये होत आहे.

पिक्सेल वॉच 2

गुगलने आज आपली नवीन पिक्सेल वॉच 2 देखील लाँच केली. याची किंमत भारतात 39,990 रुपये आहे. मात्र, पिक्सेल 8 स्मार्टफोनसोबत घेतल्यास यावर तब्बल 20 हजार रुपयांची सूट मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

Election Commission of India : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीदरम्यान निवडणूक आयोगात मोठे फेरबदल; मतदारयादी विभागातील अधिकाऱ्यांची बदली

वयाच्या ६० व्या वर्षीही मिलिंद सोमण अनवाणी धावतात! पायांच्या स्नायूंना होतात 'हे' फायदे; पण ही काळजी घ्या

सायन रुग्णालयात डॉक्टरने जीवन संपवलं; स्वत:लाच सलाईन लावत ॲनस्थेशियाचा ओव्हरडोस घेतला, बाथरूममध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News : सीजेपी आंदोलकांची पुण्यात धरपकड

SCROLL FOR NEXT