iPhone 15 Vs Pixel 8 Pro eSakal
विज्ञान-तंत्र

iPhone 15 Vs Pixel 8 Pro : गुगल की अ‍ॅपल, कोणत्या कंपनीचा नवीन फोन आहे बेस्ट ऑप्शन?

Google vs Apple : तुम्ही जर या दोन्हीपैकी एक स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर या दोन्हीमधील फरक जाणून घेणं गरजेचं आहे.

Sudesh

गेल्याच महिन्यात अ‍ॅपलने आयफोन 15 सीरीज लाँच केली होती. यानंतर गुगलने नुकतीच भारतात आपली पिक्सेल 8 सीरीज लाँच केली आहे. आयफोनची विक्री सुरू झाली असून, पिक्सेलची बुकिंग सध्या सुरू आहे. या सगळ्यात, तुम्ही जर या दोन्हीपैकी एक स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर या दोन्हीमधील फरक जाणून घेणं गरजेचं आहे.

अ‍ॅपलच्या आयफोन 15 च्या बेस व्हेरियंटमध्ये भरपूर कलर ऑप्शन पहायला मिळतात. तर पिक्सेल 8 प्रो मध्ये तीनच कलर ऑप्शन मिळत आहेत. दोन्ही फोनमध्ये सर्वात अत्याधुनिक चिपसेट मिळत आहे. पिक्सेल 8 प्रो स्मार्टफोनमध्ये गुगलची नवीन टेन्सॉर G3 चिपसेट मिळते. तर, आयफोन 15 मध्ये A16 बायोनिक चिपसेट मिळते.

डिस्प्ले

आयफोन 15 मध्ये 6.1 इंच रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा पीक ब्राईटनेस 2000 निट्स आहे. तर पिक्सेल 8 प्रो या फोनमध्ये 6.7 इंच सुपर अ‍ॅक्ट्वा डिस्प्ले मिळतो. याचा पीक ब्राईटनेस 2,400 निट्स आहे.

बॅटरी अन् चार्जिंग

आयफोन 15 मध्ये 3,349 mAh बॅटरी मिळते. ही 27W चार्जिंगला सपोर्ट करते. तर, पिक्सेल 8 प्रो स्मार्टफोनमध्ये 5,050 mAh बॅटरी मिळते, जी 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. दोन्ही स्मार्टफोनमध्ये आता यूएसबी टाईप-सी चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे.

कॅमेरा

गुगल पिक्सेल 8 प्रो फोनमध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. यामध्ये 50MP वाईड अँगल लेन्स, 48MP अल्ट्रावाईड सेन्सर आणि 48 मेगापिक्सलची 5X टेलिफोटो लेन्स देण्यात आली आहे. तर आयफोन 15 मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल आहे, तर दुसरा कॅमेरा 12 मेगापिक्सल क्षमतेचा आहे.

किंमत

दोन्ही फोनमध्ये प्राईज फॅक्टर हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. गुगल पिक्सेल 8 प्रो या फोनची किंमत भारतात 1,06,999 रुपयांपासून सुरू होत आहे. तर आयफोन 15 ची किंमत 79,990 रुपयांपासून सुरू होते. पिक्सेलच्या 8 मॉडेलची किंमत आणखी कमी आहे, मात्र त्यात फीचर्स देखील कमी आहेत. तसंच, आयफोन 15 च्या प्रो मॉडेलमध्ये भरभरून फीचर्स आहेत, मात्र त्याच्या टॉप मॉडेलची किंमत दोन लाखांपर्यंत जाते.

कोणता पर्याय योग्य?

अँड्रॉईड फॅन्ससाठी गुगलचा पिक्सेल 8 प्रो हा स्मार्टफोन चांगला पर्याय ठरू शकतो. किंमतीच्या मानाने यात भरभरून फीचर्स देण्यात आले आहेत. तसंच यातील एआय फीचर्स हे तुम्हाला अगदी बेस्ट यूजर एक्सपीरियन्स देतील. आयओएस आवडणाऱ्यांसाठी आयफोन 15 बेस मॉडेल किंवा आयफोन 14 प्रो मॉडेल हे चांगले पर्याय ठरू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT