Google new Office in Pune Video : गुगलने पुण्यामध्ये नुकतंच नवीन ऑफिस सुरू केलं आहे. कोरेगाव पार्क अॅनेक्स येथे गुगलने आपलं हे नवं ऑफिस उघडलं आहे. हे ऑफिस आतून कसं आहे याचा व्हिडिओ तेथील एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने शेअर केला आहे. यामध्ये या ऑफिसमध्ये असणाऱ्या अॅमेनिटीज देखील सांगितल्या आहेत. पुण्यातील या ऑफिसमध्ये तब्बल 1,300 कर्मचारी काम करु शकणार आहेत, असं गुगलने सांगितलं आहे.
अर्श गोयल नावाच्या कर्मचाऱ्याने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. गुगलच्या कर्मचाऱ्यांना पुण्यातील या नव्या ऑफिसमध्ये कोणत्या सोयी-सुविधा मिळतील हे या व्हिडिओत दिसत आहे. या ऑफिसमध्ये एक कॅफे, गेम झोन, रीक्रिएशन रूम आणि अतिशय आकर्षक इंटेरियर असलेलं पहायला मिळत आहे. गुगलचं हे भारतातील पाचवं ऑफिस आहे. गुगलचं भारतातील हेडक्वार्टर्स हे हैदराबादमध्ये आहे. (Google Office Amenities)
गोयल यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओला पाच लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. कित्येक नेटिझन्स या ऑफिसचं कौतुक करत आहेत. कित्येक जणांनी याठिकाणी काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, तर कित्येकांनी आपलं ऑफिसही असंच असायला हवं होतं असं म्हटलं आहे. (Google Pune Office Interiors)
"रेफरल दे दो भैय्या", "ह्याने काम सोडून सगळं केलं..", "हे ऑफिस आहे की बार्बेक्यू नेशन?", "मला प्लीज तिथे घेऊन जा" अशा भन्नाट कमेंट्स गोयल यांच्या व्हिडिओवर पहायला मिळत आहेत. यामध्ये कित्येकांनी गुगल देत असलेल्या फॅसिलिटीजचं कौतुक देखील केलं आहे. यात ऑफिसमधील 'मसाज चेअर' ही खास चर्चेचा विषय ठरत आहे. ऑफिसमध्येच दुपारची वामकुक्षी घेता-घेता मसाजची देखील सोय व्हावी या उद्देशाने ही चेअर ठेवली आहे का? असा प्रश्न नेटिझन्स उपस्थित करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.