Google  Sakal
विज्ञान-तंत्र

Google Search Engine Down : जगभरात गुगल सर्च इंजिन डाऊन, हजारो यूजर्सला फटका

आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट Downdetector.com ने Google आउटेजची पुष्टी केली.

सकाळ डिजिटल टीम

Google Search Engine Down : संपूर्ण जगात सर्च इंजिन म्हणून लोकप्रिय असलेले गुगल मंगळवारी सकाळी काही काळासाठी बंद पडले. यामुळे युजर्समध्ये एकच खळबळ उडाली. आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट Downdetector.com ने Google आउटेजची पुष्टी केली. जगभरातील Google सर्च इंजिन सुमारे 10 मिनिटांसाठी डाउन झाले होते. तथापि, या समस्येवर त्वरीत हालचाली करत ही सेवा काही काळातच पुन्हा सुरू केली. सेवा अचानक बंद झाल्यामुळे जागातील लाखो युजर्सला याचा फटका बसला. मात्र, ही सेवा अचानक कशी डाऊन झाली याचे कोणतेही ठोस कारण अद्याप समजू शकलेले नाही.

मंगळवारी सकाळी गुगल सर्चमध्ये 40,000 हून अधिक समस्यांची नोंद करण्यात आली ज्यावेळी युजर्स काही सर्च करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी Google पेजवर सर्व्हर 500 असा एअर दाखवत होता. तसेच पुन्हा 30 सेकदांनी युजर्सला प्रयत्न करा, होणाऱ्या समस्येबद्दल आम्ही दिलगीर असून, याबाबत संबंधित अभियंत्यांना सूचित करण्यात आले असून, समस्या सोडवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचा संदेश दिसून येत होता.

गुगल सर्चशिवाय Google Trends ही सेवा देखील काही काळासाठी बंद पडली होती. लिंक ओपन होत असली तरी, ट्रेंड दाखवणारी विंडो रिकामी होती. यामुळे ट्रेडिंग विषयांच्या सर्चसाठीदेखील युजर्सला त्रासाला सामोरे जावे लागले. रिअल-टाइम ट्रेंड मात्र व्यवस्थित काम करत होते. काही मिनिटांनी सेवा पूर्ववत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महामुंबईला चटके तर नागपूर पुन्हा 'हॉट', विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा; अकोला, महाडमध्ये पारा ४५ अंशावर

Uday Samant Kagal : उदय सामंतांचे मुश्रीफांना बालेकिल्ल्यातच आव्हान, 'कागल मतदारसंघ शिवसेनेचा होईल'; मंडलिकांना पाठबळ

'प्रियांका चोप्रासोबतच्या किसिंग सीनवेळी...'अन्नू कपूर 15 वर्षापूर्वीच्या वादावर म्हणाले, ' माझ्यासोबत किसिंग करताना ती'

'Vaibhav Sooryavanshi चा तर मी फॅनच झालोय, तो खूपच...' पॅट कमिन्स १५ वर्षांच्या पोराची बॅटिंग बघून झाला फिदा; पाहा काय म्हणाला

Latest Marathi News Live Update: नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा कहर, पारा 44 अंश सेल्सिअसवर

SCROLL FOR NEXT