gmail account inactive from 20 september esakal
विज्ञान-तंत्र

Gmail Account Inactive : उद्या तुमचं Gmail Account होणार बंद! आताच 'असं' करा सुरक्षित, कंपनीनं का घेतला निर्णय?

gmail account inactive from 20 september : 20 सप्टेंबरपासून निष्क्रिय असलेले जीमेल अकाउंट बंद करण्याची मोहिम Google सुरु करत आहे.

Saisimran Ghashi

Gmail Account Inactive : तंत्रज्ञानाच्या युगात जीमेल न वापरणाऱ्यांची संख्या तशी फार कमी आहे. जीमेल वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. 20 सप्टेंबरपासून गेल्या दोन वर्षांपासून निष्क्रिय असलेले जीमेल अकाउंट बंद करण्याची मोहिम Google सुरु करत आहे. त्यामुळे तुमचं जीमेल अकाउंट सक्रिय आणि सुरक्षित आहे याची खात्री करा.

तुमचं जीमेल अकाउंट निष्क्रिय का ठरू शकतं?

आजकाल अनेक लोक अनेक जीमेल अकाउंट बनवतात पण त्यांचा वापर करत नाहीत.जास्त महिन्यांपर्यंत अकाऊंट बंद राहिल्यास त्याचा गैरवापर देखील होऊ शकतो. यामुळे Google कंपनी असे निष्क्रिय अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

तुमचं जीमेल अकाउंट सुरक्षित कसं ठेवाल?

जीमेलमध्ये लॉग इन करा: तुमचं जीमेल अकाउंट सुरक्षित ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यामध्ये लॉग इन करणे.

ईमेल पाठवा किंवा वाचा: तुमच्या इनबॉक्समधील ईमेल पाठवून किंवा वाचून तुमचं अकाउंट सक्रिय असल्याचं Googleला कळवू शकता.

Googleच्या सेवा वापरा: तुमचे Google Photos, Google Drive अकाउंट वापरा किंवा फाईल शेअर करा. यामुळे तुमचं जीमेल सक्रिय असल्याचं समजलं जाईल.

YouTube व्हिडिओ पाहा: YouTube वर व्हिडिओ पाहण्यासाठी जीमेल लॉग इन केल्यानेही तुमचं अकाउंट सुरक्षित राहते.

Google सर्च करा: जीमेलमध्ये लॉग इन करून Google सर्च वापरल्यानेही तुमचं अकाउंट सक्रिय राहते.

Google सतत आपल्या सेवा सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे. निष्क्रिय अकाउंट बंद करून ते सर्व्ह्‍वरवरील जागा वाचवण्याचा आणि सध्या वापरात असलेल्या अकाउंटवर अधिक लक्ष देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

जर तुमच्याकडे अनेक जीमेल अकाउंट असतील आणि तुम्हाला ते बंद करायचे नसतील तर त्यांना सक्रिय ठेवणं आवश्यक आहे. वरील टिप्स प्रत्येक अकाउंटसाठी वापरा आणि तुमच्या सर्व जीमेल अकाउंट सुरक्षित ठेवा.

या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स वापरुन तुमचे जीमेल अकाउंट सुरक्षित आणि सक्रिय ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

Pune Property tax: ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील करमाफीवरून वाद; भाजपने पुणेकरांची फसवणूक केल्याचा 'आप'चा आरोप

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीच्या प्रतिक्षा, पण पाऊस करणार गेम? पहिल्या T20I सामन्यासाठी काय आहेत हवामान अंदाज?

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Pune Crime: पुण्यात मित्रच ठरला मारेकरी! किरकोळ वादाचे पर्यवसान खुनात; मित्रानेच लोखंडी पाईपने डोक्यात वार करून घेतला जीव

SCROLL FOR NEXT