Google Ads Policy  esakal
विज्ञान-तंत्र

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Google Ads Policy: Google ने 30 मे 2024 पासून डीपफेक पॉर्न प्रमोशनवर बंदी घालण्यासाठी धोरणे कडक केली. जाहिरातदारांना AI-जनरेट केलेल्या इमेज, टूल्स आणि छुपे ॲप्स वापरून पॉर्नचा प्रचार किंवा फेरफार केल्याबद्दल निलंबनाचा धोका आहे, 2023 मध्ये 1.8 अब्ज जाहिराती काढून टाकण्यात आल्या आहेत.

Sandip Kapde

Google Ads Policy

डीपफेक पोर्नोग्राफी निर्माण करणाऱ्या वेबसाईट आणि अॅप्सची जाहीरात नाकारण्यासाठी गुगलने कठोर भूमिका घेतली आहे. गुगलने आपली जाहीरात पॉलिसी अपडेट केली आहे. ३० मे २०२४ पासून नवीन पॉलिसी लागू होणार आहे. एआयचा वापर करुन पोर्न सामग्री तयार करणाऱ्यांविरोधात लढा देण्याची गुगलचे उद्दीष्ट आहे.

गुगलच्या अयोग्य सामग्री धोरणांतर्गत, जाहिरातदारांनी डीपफेक पॉर्न निर्माण करणाऱ्या साइट्स किंवा ॲप्सचा प्रचार केल्यास तसेच ते कसे तयार करावे याच्या सूचना दिल्या किंवा विविध डीपफेक पॉर्न सेवांचे समर्थन आणि तुलना केल्यास त्यांना चेतावणीशिवाय करार रद्द करण्यात येणार आहे. ते पुन्हा गुगलवर जाहीरात देखील करु शकणार नाहीत.

पोर्नोग्राफिक सामग्री तयार करण्याचे अनेक अॅप्स मार्केटमध्ये वाढले आहेत. या पार्श्वभूमिवर गुगलने नवीन धोरण राबवले आहे. Apple ॲप स्टोअर आणि  Google Play Store वर देखील अनेक अॅप्स उपलब्ध आहेत.

Google ची धोरणे आधीच विशिष्ट प्रकारच्या लैंगिक सामग्री असलेल्या जाहिरातींवर कठोर निर्बंध घालतात. लैंगिकरित्या सुस्पष्ट किंवा नग्नता असणाऱ्या सिंथेटिक सामग्रीचा प्रचार करणे हे कंपनीच्या नियमांचे स्पष्ट उल्लंघन आहे.

धोरणातील बदलापूर्वी, Google ने आधीच खरेदी जाहिरातींमध्ये लैंगिकदृष्ट्या स्पष्ट डीपफेक तयार करणाऱ्या सेवांवर प्रतिबंध घालण्यास सुरुवात केली होती. या बंदीमध्ये डीपफेक पॉर्न ट्यूटोरियल आणि डीपफेक पॉर्न जनरेटरची जाहिरात करणारी वेबसाईट आणि अॅप्स समाविष्ट आहेत.

जाहिरातदारांना ३० मे लागू होण्याच्या तारखेपूर्वी नवीन धोरणाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही जाहिराती काढून टाकण्याची परवानगी देण्यात आली आहे. २०२३ मध्ये, Google ने त्याच्या वार्षिक जाहिरात सुरक्षा अहवालानुसार लैंगिक सामग्रीवरील धोरणांचे उल्लंघन केल्याबद्दल १.८ अब्ज जाहिराती काढून टाकल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhaji Maharaj Procession : छत्रपती संभाजी महाराजांच्या मिरवणूकीला पोलिसांनी परवानगी नाकारली, शिव-शंभू समर्थक आक्रमक, गारगोटीत तणाव

मोठी बातमी! मॉर्टगेज लोनसाठी शेतकऱ्यांना बॅंकांचे दरवाजे बंद; थकबाकी वाढल्याने बॅंकांनी आखडला हात; केवळ पीक कर्जवाटपालाच प्राधान्य, वाचा...

Panchang 15 May 2026 : आजचे पंचांग! शनि जयंती, अमावस्या आणि शुभ मुहूर्त; जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण राशीभविष्य

Weekend Breakfast Special: रोजच्या पराठ्यांना द्या हेल्दी ट्विस्ट! वीकेंडला ट्राय करा पनीर स्टफ्ड बीटरूट पराठा

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १६ मे २०२६ ते २२ मे २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT