Google esakal
विज्ञान-तंत्र

Googleचा मोठा निर्णय, अँड्रॉईड स्मार्टफोन यूजर्सची लागणार लॉटरी! लवकरच दिसणार हे मोठे बदल

गुगलने भारतीयांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे

सकाळ ऑनलाईन टीम

Google Update : गुगलसाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे. भारतातील जवळपास 97 टक्के स्मार्टफोन हे गुगलच्या अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहेत. गुगलने भारतीयांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. गुगलच्या एका निर्णयाने अँड्रॉईड स्मार्टफोन युजर्सची चांदी होणार आहे.

खरं तर, आत्तापर्यंत अँड्रॉईड स्मार्टफोन विकत घेतल्यावर त्यामध्ये अनेक गुगल ॲप्स आधीच देण्यात आले होते. जे तुम्हाला हवे असतानाही फोनवरून काढता आले नाही. पण आता गुगलने भारतीय स्मार्टफोन उत्पादकांना त्यांच्या आवडीचे ॲप्स इन्स्टॉल करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.

Google ॲप्स काढण्यात सक्षम असेल

म्हणजे यूजर्स फोनमध्ये त्यांच्या आवडीचे ॲप्स इन्स्टॉल करू शकतील. तसेच कोणते सर्च इंजिन वापरायचे? त्याबाबतही निर्णय होऊ शकतो. आत्तापर्यंत गुगलची अट होती की जर स्मार्टफोन कंपन्यांनी अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीम वापरली तर त्यांना गुगल क्रोम, जीमेल, गुगल ड्राईव्ह, गुगल मॅप, गुगल मीट असे गुगलचे ॲप्स वापरावे लागतील.

गुगलने यू-टर्न का घेतला

नुकताच भारतीय स्पर्धा आयोग म्हणजेच CCI ने गुगलच्या विरोधात निर्णय दिला. ज्यामध्ये गुगल भारतात मनमानी पद्धतीने व्यवसाय करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. याला प्रत्युत्तर म्हणून भारतातून गुगलवर 1300 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात गुगलने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, या प्रकरणात गुगलला सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही सूट दिलेली नाही. सीसीआयच्या निर्णयानंतर गुगलने यू-टर्न घेत आपल्या जुन्या अटी व शर्ती बदलल्या आहेत. गुगल भारतात चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करत असल्याचा आरोप न्यायालयाने केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

Palkhed Dam Tricolour Lighting: तिरंग्याच्या रंगात न्हाले धरणः स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मनमोहक तिरंगी विद्युत रोषणाई

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

Kamalakar Chaskar Police Medal: चास गावच्या सुपूत्राला केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून उल्लेखनीय कामगिरीबद्दल 15 ऑगस्ट रोजी अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर

SCROLL FOR NEXT