Google  sakal
विज्ञान-तंत्र

Google New feature : गुगल आणत आहे अप्रतिम फीचर, आता तुम्ही हाईड करू शकणार तुमचे सिक्रेट फोटो आणि व्हिडिओ

गल आणत आहे अप्रतिम फीचर, जाणून घ्या...

Aishwarya Musale

गुगलच्या अँड्रॉइड ओएसची लोकप्रियता कोणापासूनही लपलेली नाही. आता गुगल एका नवीन फीचरवर काम करत आहे, ज्याच्या मदतीने मोबाईल यूजर्स त्यांचे अॅप्स सहज हाईड करू शकतील. अनेक वापरकर्ते त्यांच्या प्रायव्हसीसाठी मेसेजिंग अॅप्स किंवा इतर अॅप्सला हाईड करतात . त्यासाठी तो वेगवेगळ्या ट्रिक्स आणि प्रोसेसही फॉलो करतात.

गुगलने एक नवीन फीचर डेव्हलप करण्यास सुरुवात केली आहे. याचे नाव प्रायव्हेट स्पेस असून ते फोनमधील अँड्रॉइड अॅप्स हाईड करण्याचे काम करेल. स्टॉक अँड्रॉइड यूजर्सना हे फीचर्स मिळणार आहेत.

स्टॉक अँड्रॉइड

स्टॉक अँड्रॉइडचा अनुभव अनेकांना आवडतो, कारण तो अगदी सोप्या इंटरफेसमध्ये येतो. यात गुगल अॅप्सशिवाय ब्लोटवेअर उपलब्ध नाही. यामुळे स्टॉक अँड्रॉइड वापरकर्ते इतर Android स्किनमध्ये उपलब्ध असलेली अनेक फीचर्स मिळवू शकत नाहीत.

अँड्रॉइड स्किनमध्ये, वापरकर्त्यांना अॅप्स हाईड करण्याचे फीचर मिळते, परंतु स्टॉक अँड्रॉइड अॅप्समध्ये हे वैशिष्ट्य उपलब्ध नाही. पण आता स्टॉक अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि लवकरच त्यांना प्रायव्हेट स्पेस नावाचे फीचर मिळेल, जे त्यांना अॅप्स हाईड करण्याची परवानगी देईल.

Private Space फीचर सध्या बीटा आवृत्तीमध्ये आहे

हे Private Space फीचर सध्या बीटा टेस्टिंगमध्ये आहे. हे फीचर प्रथम न्यू सेटिंग्ज पेजवर पाहिले गेले आहे, जे Android 14 QPR2 बीटा 1 मध्ये आहे. ही आवृत्ती गेल्या महिन्यात लॉन्च करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्समधून ही माहिती मिळाली आहे. एका रिपोर्टनुसार, हे फीचर Settings > Security & Privacy > Private Space मध्ये जाऊन ऍक्सेस केले जाऊ शकते.

एकदा Private Space इनेबल केल्यानंतर, वापरकर्ते त्यांचे अॅप्स सहजपणे हाईड आणि सिक्योर करू शकतात. अॅप्स लिस्टच्या तळाशी जाऊन तुम्ही ते एक्सेस करू शकता. सर्व Private Space अॅप्स लॉकद्वारे संरक्षित केले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime: नागपूर शहरातील ऑनलाइन बेटिंगची लिंक दुबईपर्यंत; दिल्ली- राजस्थानात मास्टरमाईंड, ५०० रुपयांचा फ्रॉड आता कोट्यवधीपर्यंत!

Breaking News Live Update: धाराशिव मधील विमानतळावर शिवसैनिक व पोलिसात बाचाबाची

Vastu Tips : किचनमध्ये नक्की ठेवा 'या' 5 वस्तू; घरी होणार नाही पैशाची कमी, कुटुंबातल्या आरोग्याच्या समस्या होतील दूर, नोकरी-धंद्यात यश

Vidarbha Premier League 2026: विदर्भ प्रीमियर लीगचा थरार १ जूनपासून; नवे नाव, अधिकृत लोगो, शुभंकरचे थाटात अनावरण, यंदा २७ सामने

8th Pay Commission ची पुणे अन् दिल्लीत 'या' तारखेला महत्त्वाची बैठक, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ अन् पेन्शनबाबत होणार मोठा निर्णय?

SCROLL FOR NEXT