Google Sakal
विज्ञान-तंत्र

Google Searches: भारतीयांचा नादच खुळा! Sex on the beach ते ब्रम्हास्त्र... २०२२ मध्ये 'हे' टॉपिक्स केले सर्वाधिक सर्च

Google ने Google Year in Search 2022 ची लिस्ट जारी केली आहे. यात कंपनीने वर्षभरात सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या टॉपिक्सची माहिती दिली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Google Year in Search 2022: गुगलने Google Year in Search 2022 ची लिस्ट जारी केली आहे. यात कंपनीने वर्षभरात सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या टॉपिक्सची माहिती दिली आहे. Google Year in Search 2022 मध्ये IPL बाबत सर्वाधिक सर्च करण्यात आले. त्यानंतर करोनाची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या CoWin साइटला सर्च करण्यात आले आहे.

हेही वाचा- Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

फीफा वर्ल्ड कप चर्चेत

२०२२ मध्ये भारतीयांनी फीफा वर्ल्ड कप आणि आशिया कपबाबत देखील सर्च केले. 'What is' सेक्शनमध्ये अग्निपथ योजना टॉपवर आहे. तर NATO आणि NFT मध्ये देखील अनेकांनी रस दाखवल्याचे पाहायला मिळाले. 'How t'o सेक्शनमध्ये वॅक्सिन सर्टिफिकेट डाउनलोड कसे करावे, याबाबत यूजर्सकडून सर्च करण्यात आले. PTRC डाउनलोड करण्याची पद्धत देखील यूजर्सने गुगलवर सर्वाधिक शोधली.

ब्रह्मास्त्र सर्चमध्ये टॉपवर

चित्रपटांच्या कॅटेगरीमध्ये Brahmastra: Part One – Shiva टॉपवर आहे. यानंतर अनुक्रमे K.G.F: Chapter 2, द कश्मीर फाइल्स, RRR आणि कांताराबाबत सर्वाधिक सर्च करण्यात आले. चालू घडामाडींमध्ये लता मंगेशकर यांच्याबाबत सर्वाधिक सर्च करण्यात आले. सिद्धू मूसेवालाच्या मृत्यूबाबतच्या बातम्या देखील गुगलवर शोधण्यात आल्या. रशिया-युक्रेन युद्ध देखील यावर्षी चर्चेत राहिले.

रेसिपीबद्दल सांगायचे तर पनीर या लिस्टमध्ये टॉपवर आहे. तर दुसऱ्या स्थानावर मोदक आहे. Sex on the beach ने या लिस्टमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे. Sex on the beach हे एक कॉकटेल आहे. यात वोडका, पीच श्रॅप्स, ऑरेज ज्यूस आणि क्रॅनबेरी ज्यूचा समावेश असतो.

Near me कॅटेगरीमध्ये भारतीयांनी Covid vaccine near me हे सर्वाधिक सर्च केले. या लिस्टमध्ये Swimming pool near me दुसऱ्या क्रमांकावर, तर Water park near me तिसऱ्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT