google  
विज्ञान-तंत्र

Google Year in Search 2020: यूजर्सकडून वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन कोर्सेसबद्दल सर्वाधिक सर्च 

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : सर्च इंजिन गूगलने सन २०२० चा Annual Report 'Year In Search' हा वार्षिक अहवाल जारी केला आहे. अहवालात असे नमूद केले गेले आहे की गेल्या वर्षी कोरोना विषाणूच्या साथीच्या आजारामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनदरम्यान आणि त्यानंतर भारतात वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाइन कोर्सेस याबद्दल सर्वाधिक यूजर्सनी सर्च केले. तसेच इतरही अनेक महत्वाच्या गोष्टी आत सर्च करण्यात आल्या. चला तर मग जाणून घेऊया आणखी काही Year In Search.

सर्चमध्ये इतकी झाली वाढ

गुगलच्या अहवालानुसार सन २०२० मध्ये वर्क फ्रॉम होमच्या शोधात २०१९ च्या तुलनेत १४० टक्के वाढ दिसून आली. त्याचबरोबर ऑनलाइन अभ्यासक्रमांच्या शोधात ८५ टक्के वाढ दिसून आली. या व्यतिरिक्त प्रमाणपत्र अभ्यासक्रमांच्या (Certification Course)  शोधात ५० टक्के वाढ झाली आहे. इतकेच नाही तर ऑनलाइन वस्तू कशा विकायच्या, या शोधात ६५ टक्के वाढ दिसून आली. 

या राज्यांत सर्वाधिक वर्क फ्रॉम होम सर्च 

वर्क फ्रॉम होम शोधणार्‍या राज्यांमध्ये तेलंगणा आघाडीवर आहे. त्यानंतर कर्नाटक, आंध्र प्रदेश, पुडुचेरी आणि महाराष्ट्रात याचा सर्वाधिक शोध घेण्यात आला.

ही शहरे सर्चमध्ये अग्रेसर

महाराष्ट्रातील मीरा भाईंदर शहरात वर्क फ्रॉम सर्वाधिक शोधले गेले. त्याशिवाय सिकंदराबाद, ठाणे, हैदराबाद, पिंपरी चिंचवड, गाझियाबाद, बेंगलुरू, नवी मुंबई, विशाखापट्टणम आणि म्हैसूर या ठिकाणी वर्क फ्रॉम होमचा सर्वाधिक शोध घेण्यात आला.

लॉकडाऊनचा परिणाम 

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा धोका रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन लावण्यात आला. . ज्यामुळे लाखो लोकांनी घरून काम केले. या लॉकडाऊनमुळे हजारो लोक बेरोजगार झाले. यामुळे वर्क फ्रॉम सर्चमध्ये मोठी वाढ झाली.

संपादन आणि संकलन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT