Mobile Component Import eSakal
विज्ञान-तंत्र

Mobile Component Import : आता स्मार्टफोन्स होणार स्वस्त! अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोदी सरकारचं गिफ्ट; आयात शुल्क केलं कमी

भारत सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण गुरुवारी देशाचं अंतरिम बजेट सादर करतील.

Sudesh

Government of India slashes import duty : भारत सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण गुरुवारी देशाचं अंतरिम बजेट सादर करतील. मात्र यापूर्वीच मोदी सरकारने देशवासीयांना मोठं गिफ्ट दिलं आहे. मोबाईल फोन उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या कंपोनेंट्स आणि पार्ट्सवरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हे शुक्ल पूर्वी 15 टक्के होतं, जे आता 10 टक्के करण्यात आलं आहे.

सरकारने जारी केलेल्या पत्रकानुसार, सिम सॉकेट, मेटल पार्ट्स, सेल्युलर मॉड्यूल आणि अन्य मेकॅनिकल पार्ट्सवर लागणारे आयात शुल्क आता पाच टक्के कमी असणार आहे. यामुळे भारतात स्मार्टफोन उत्पादन घेणाऱ्या कंपन्यांना मोठा फायदा होणार आहे.

सरकारच्या या निर्णयानंतर आता भारतात कमी किंमतीमध्ये स्मार्टफोन तयार होणार आहेत. यामुळे 'मेड इन इंडिया' स्मार्टफोनच्या किंमती कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतात स्मार्टफोन निर्मितीला भरपूर चालना मिळाली आहे. त्यामुळे कित्येक लोकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

सॅमसंग-अ‍ॅपल

'मेक इन इंडिया' अभियानामुळे कित्येक जागतिक कंपन्या भारतात स्मार्टफोनचे उत्पादन घेत आहेत. अ‍ॅपल आणि सॅमसंग या दिग्गज कंपन्यांनी आपले नवे मॉडेल्स भारतात तयार करण्यास सुरुवात केली आहे. आयात शुल्क कमी झाल्यामुळे आता या मोठ्या कंपन्यांचे भारतात तयार केलेले स्मार्टफोन देखील स्वस्त होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT