Deepfake Law eSakal
विज्ञान-तंत्र

Deepfake Law : 'डीपफेक'बाबत सरकार गंभीर; येऊ शकतो नवा कायदा! दिग्गज कंपन्यांसोबत होणार बैठक - रिपोर्ट

Rajeev Chandrasekhar on Deepfake : भारतीय इंटरनेट यूजर्ससाठी डीपफेक हा एक स्पष्ट धोका आहे; असं राजीव चंद्रशेखर म्हणाले.

Sudesh

Deepfake Videos : काही दिवसांपूर्वी काही बॉलिवूड अभिनेत्रींचे डीपफेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. यानंतर डीपफेक तंत्रज्ञानाबद्दल सर्वच स्तरातून भीती व्यक्त करण्यात येत होती. पुढे पंतप्रधान मोदींनी देखील या व्हिडिओंचा उल्लेख केला होता. यानंतर आता केंद्र सरकार डीपफेक व्हिडिओंबाबत नवीन कायदा आणण्याचा विचार करत आहे.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याबाबत माहिती दिली. यासाठीच मेटा, गुगल आणि इतर सोशल मीडिया कंपन्यांसोबत सरकार बैठकीचे आयोजन करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस या बैठका चालतील.

गुरुवारी होणाऱ्या बैठकीत फोटो-व्हिडिओ एडिट करुन त्याचा गैरवापर करणे याबाबत चर्चा होईल, तर आयटी नियमांच्या पालनाबाबत शुक्रवारी चर्चा पार पडणार आहे. हिंदुस्तान टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. (Tech News)

डीपफेक मोठा धोका

इंटरनेट आणि एआय हे मानवाच्या मदतीसाठी आहेत. मात्र, यांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करण्यात येत आहे. भारतीय इंटरनेट यूजर्ससाठी डीपफेक हा एक स्पष्ट धोका आहे; असं चंद्रशेखर यावेळी म्हणाले.

"आम्ही यावर्षीच्या एप्रिल महिन्यात आयटी नियम तयार केले आहेत. आम्ही (डीपफेक नियमांबाबत) एक फ्रेमवर्क तयार करणार आहोत, मात्र तिथेच थांबणार नाही. गरज भासल्यास आम्ही यासंबंधी नवीन कायदा देखील करू. इंटरनेट वापरणाऱ्या 1.2 अब्ज भारतीयांच्या सुरक्षेसाठी, डीपफेक आणि फेक न्यूजला आवर घालण्यासाठी जे गरजेचं आहे ते आम्ही करू." असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT