google chrome Sakal
विज्ञान-तंत्र

Google Chrome वापरताय? सरकारने युजर्सला दिलाय इशारा

सकाळ डिजिटल टीम

गुगल क्रोम (Google Chrome Browser) हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे ब्राउझर आहे. हे ब्राउझर विंडोज आणि अँड्रॉइडवर सर्वाधिक वापरले जाते. तुम्हीही गुगल क्रोम वापरत असाल तर सरकारने तुमच्यासाठी एक अलर्ट जारी केला आहे. याबाबत IT मंत्रालयाचा भाग असलेल्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने माहिती दिली आहे.

इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम नुसार, हॅकर्स तुमच्या गुगल क्रोमवर लक्ष ठेवून आहेत. तुम्ही खबरादारी घेतली नाहीतर हॅकर्स तुमची वैयक्तिक माहिती चोरून तुमची फसवणूक करू शकतात. तुमच्या माहितीचा गैरवापर होऊ शकतो. तसेच तुम्ही काय पाहताय, काय नाही यावर हॅकर्स लक्ष ठेवू शकते. तुमच्या डिव्हाईसमध्ये मालवेअर देखील टाकू शकतात. तसेच तुमच्या डिव्हाईसमधील डेटा देखील डिलिट करू शकतात. त्यामुळे युजर्सने गुगल Chrome चे ९२ व्हर्जन अपडेट करावे, असं CERT-In ने सांगितले आहे.

Google ने अलीकडेच त्यांच्या Chrome ब्राउझरमधील गंभीर त्रूटी दूर केल्या आहेत. गुगलने अपडेट केलेले Chrome ब्राऊझर युजर्ससाठी सुरक्षित असेल. त्यामुळे गुगलने देखील युजर्सना हे ब्राऊझर अपडेट करण्याचा सल्ला दिला होता. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने देखील युजर्सला गुगलचे Chrome ब्राऊझर अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. आपल्या डेटाबाबत चिंता असलेल्या युजर्स गुगल Chrome अपडेट करून आपल्या डिव्हाईसमध्ये इंस्टॉल करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT