Telegram Fraud Fake Gift Card Governement Issues Alert  esakal
विज्ञान-तंत्र

Telegram Fraud : सावध व्हा! टेलिग्रामवर सुरुय मोठा फ्रॉड; आत्ताच जाणून घ्या प्रकरण काय, नाहीतर पस्तावाल

Telegram Fraud Fake Gift Card Governement Issues Alert : दूरसंचार विभागाने टेलीग्रामवरील फसवणूकीबद्दल अलर्ट जारी केला आहे. वापरकर्त्यांना फसव्या मेसेजेस, घरातून काम करण्याच्या योजना आणि खोट्या गिफ्ट कार्ड ऑफर्सपासून सावध राहण्याचे सांगण्यात आले आहे.

Saisimran Ghashi

Telegram Fake Gift Card Fraud : टेलिग्राम अॅपचा वापर सध्या प्रचंड वाढला आहे. व्हॉट्सअॅपचा पर्याय म्हणून अनेकजण टेलिग्रामचा वापर करत आहेत. मात्र, या लोकप्रिय अॅपवरही घोटाळेबाज सक्रिय झाले आहेत. ग्राहकांना फसवण्याचे नवनवे फंडे वापरत हे घोटाळेबाज आपले जाळे पसरवत आहेत. याच पार्श्वभूमीवर दूरसंचार विभागाने (DoT) टेलिग्रामवर सुरू असलेल्या विविध फसवणूक प्रकारांविषयी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

फसवणुकीचे प्रकार कोणते?

दूरसंचार विभागाने जारी केलेल्या अॅडव्हायजरीत असे नमूद केले आहे की, टेलिग्रामवर अनेक खोट्या चॅनेल्स आणि लिंकद्वारे लोकांना फसवण्याचे प्रकार सुरू आहेत. अनेक घोटाळेबाज स्वतःला नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून काम करत आहेत. खासकरून वर्क फ्रॉम होम स्कीम, लॉटरी जिंकल्याचे संदेश, आणि फेक वेबसाइट लिंकद्वारे लोकांना पैसे उकळण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.

याशिवाय, बनावट गिफ्ट कार्ड्स खरेदी करण्यास भाग पाडणाऱ्या लिंक पाठवल्या जात आहेत. हे घोटाळे ओळखणे अनेक वेळा कठीण होत असल्याने ग्राहकांनी अशा कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्पॅम कॉल्स रोखण्यासाठी TRAI ची कठोर भूमिका

दूरसंचार विभागासोबतच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) देखील स्पॅम कॉल्सच्या समस्येवर काम करत आहे. ट्रायने अलीकडेच भारती एअरटेल, जिओ, बीएसएनएल, आणि व्होडाफोन आयडिया यांसारख्या प्रमुख टेलिकॉम कंपन्यांवर तब्बल 12 कोटींचा दंड ठोठावला आहे.

या कंपन्या स्पॅम कॉल्स कमी करण्यासाठी आखलेल्या नियमांचे पालन करण्यात अपयशी ठरल्याने त्यांना वारंवार दंड भोगावा लागतो आहे. आतापर्यंत या कंपन्यांवर एकूण 141 कोटींचा दंड आकारण्यात आला आहे. मात्र, या नव्या दंडाविषयी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया या कंपन्यांनी दिलेली नाही.

सरकारची पुढील पावले काय?

जर या टेलिकॉम कंपन्यांनी दंड भरला नाही, तर दूरसंचार विभागाला त्यांच्या बँक गॅरंटीमधून ही रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्राहकांना स्पॅम कॉल्स व फसवणूक टाळण्यासाठी आणखी कठोर नियम लागू करण्याचे नियोजन सरकारने केले आहे.

ग्राहकांनी काय काळजी घ्यावी?

1. अनोळखी लिंक किंवा चॅनेल्सवरून आलेल्या संदेशांवर विश्वास ठेवू नका.

2. वर्क फ्रॉम होम किंवा लॉटरीसारख्या आकर्षक ऑफरचे पडताळणी केल्याशिवाय कोणतीही माहिती शेअर करू नका.

3. तुमच्या टेलिकॉम सेवा प्रदात्याला स्पॅम कॉल्सविषयी तक्रार नोंदवा.

सरकारच्या सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर ग्राहकांनी सजग राहणे महत्त्वाचे आहे. फसवणूक टाळण्यासाठी ऑनलाइन व्यवहारांबाबत अधिक सतर्कता बाळगा आणि अशा फसव्या योजनांना बळी पडणे टाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT