GTA 6 Leaks 
विज्ञान-तंत्र

GTA 6 Leaks : नव्या 'ग्रँड थेफ्ट ऑटो' गेममध्ये काय काय असणार? लीक्ड फुटेजमधून समोर आली माहिती

Grand Theft Auto : जीटीए सीरीजमध्ये मुख्य पात्र म्हणून एका फीमेल कॅरेक्टरला संधी देण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.

Sudesh

ग्रँड थेफ्ट ऑटो, म्हणजेच GTA गेम ही सर्वच गेमर्सच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. भारतातील नाईन्टीज किड्सपैकी कित्येकांची पहिली कम्प्युटर गेम ही GTA Vice City होती. त्यानंतर जीटीएचे अनेक व्हर्जन्स समोर आले. GTA 5 या गेमने तर कित्येक रेकॉर्ड्स ब्रेक केले. आता GTA 6 गेम लाँच होण्यासाठी सज्ज झाली आहे.

लाँचपूर्वीच या गेममधील कित्येक व्हिडिओ क्लिप्स लीक झाल्या आहेत. यामधून या गेमचे फीचर्स पहायला मिळत असल्याचा दावा केला जात आहे. HT टेकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. या गेममध्ये चक्क दोन मुख्य पात्रं असण्याची शक्यताही यातून वर्तवली जात आहे.

दोन मुख्य पात्रं

जीटीए गेममध्ये आतापर्यंत एकच मुख्य पात्र राहिलं आहे. मात्र आता पहिल्यांदाच GTA 6 मध्ये दोन मुख्य पात्रं असणार आहेत. जेसन आणि लुसिया अशी ही दोन पात्रं असणार आहेत. जीटीए सीरीजमध्ये मुख्य पात्र म्हणून एका फीमेल कॅरेक्टरला संधी देण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.

मॉल-इमारतींमध्ये जाता येणार

जीटीए गेम्समध्ये आतापर्यंत कित्येक मोठमोठ्या इमारती दाखवण्यात आल्या आहेत. मात्र, यातील ठराविक इमारतींमध्येच जाता येत होतं. जीटीए-6 मध्ये मात्र मॉल्स, सुपरमार्केट, बार, क्लब, पॉन शॉप, रेस्टॉरंट आणि अपार्टमेंट्समध्ये देखील आत जाता येणार आहेत.

हॅकिंग

वॉच डॉग्स गेममध्ये दाखवल्याप्रमाणे काही हॅकिंग फीचर्स देखील नव्या जीटीए गेममध्ये असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका लीकमध्ये असं दिसत आहे, की लुसिया ही आपल्यासोबत ट्रॅकर जॅमर, यूएसबी ड्राईव्ह आणि ऑटो डायलर असे डिव्हाईस घेऊन फिरत आहे. (Gaming News)

यासोबतच रेड डेड रिडम्प्शन 2 गेमप्रमाणे पोलीस रेकग्निशन सिस्टीम आणि इगल आय सिस्टीम देखील नव्या जीटीए गेममध्ये येण्याची शक्यता आहे. काही लीक्समध्ये हे फीचर्स दिसले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT