Dwarka Darshan eSakal
विज्ञान-तंत्र

Dwarka Darshan : पाणबुडीतून घेता येणार 'द्वारका' दर्शन; गुजरात सरकारची महत्त्वकांक्षी योजना

या पाणबुडीमध्ये एका वेळी 30 लोक प्रवास करू शकतील. सुमारे 35 टन वजनाच्या या पाणबुडीतून समुद्रामध्ये 300 फूट खोलीवर पर्यटकांना नेण्यात येईल.

Sudesh

Dwarka Darshan Scheme : श्रीकृष्णाचं जन्मस्थान असलेली द्वारका नगरी हजारो वर्षांपूर्वी समुद्राच्या तळाशी गेली होती. मात्र आता या द्वारका शहराचं दर्शन घेणं आपल्याला शक्य होणार आहे. गुजरात सरकार यासाठी विशेष पाणबुडी सफर सुरू करणार आहे.

एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार, या पाणबुडीमध्ये एका वेळी 30 लोक प्रवास करू शकतील. सुमारे 35 टन वजनाच्या या पाणबुडीतून समुद्रामध्ये 300 फूट खोलीवर पर्यटकांना नेण्यात येईल. या पाणबुडीमध्ये दोन डायव्हर आणि एक मार्गदर्शक असणार आहेत.

हा एकूण प्रवास दोन ते अडीच तासांचा असणार आहे. समुद्राच्या खाली जायचं म्हणजे त्यासाठी तिकीट देखील तेवढंच महाग असणार आहे. मात्र, सर्वसामान्यांना देखील यातून प्रवास करता यावा यासाठी गुजरात सरकार सबसिडी देण्याचा विचार करत आहे.

कशी असणार पाणबुडी?

  • या पाणबुडीचं वजन सुमारे 35 टन असेल.

  • संपूर्ण एसी असणाऱ्या या पाणबुडीमध्ये 30 लोक प्रवास करू शकतील.

  • यामध्ये दोन चालक, दोन डायव्हर्स, एक मार्गदर्शक आणि एक टेक्निशियन असेल. एका वेळी 24 प्रवासी प्रवास करू शकतील.

  • प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यामध्ये मेडिकल किट देखील असणार आहे.

  • यामध्ये प्रत्येक सीट ही विंडो सीट असेल, जेणेकरून सर्व प्रवाशांना द्वारका नगरीचं दर्शन घेता येईल.

  • प्रवाशांना ऑक्सिजन मास्क, फेस मास्क, स्कूबा ड्रेस मिळेल. यासाठी अतिरिक्त भाडं आकारलं जाणार नाही.

  • यामध्ये नॅचुरल लाईट येण्याची सोय केली आहे.

  • यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सोयही उपलब्ध असणार आहे.

  • यासोबतच पाणबुडीतल स्क्रीनवर तुम्ही समुद्राचा तळ, तेथील मासे एचडीमध्ये पाहू शकाल.

इतर योजनांवर काम सुरू

केंद्र सरकार देशातील धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध योजनांवर काम करत आहे. काशी-विश्वनाथ कॉरिडोअर, महाकाल लोक, अयोध्या, केदारनाथ, सोमनाथ आणि द्वारका कॉरिडोअर अशा योजनांवर वेगाने काम सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT