ZamZam iPhone Scam eSakal
विज्ञान-तंत्र

ZamZam iPhone Scam : 'बडे भाई मोफत आयफोन १४ देतायत' म्हणत गुजराती तरुणाला घातला ७ लाखांचा गंडा! पाकिस्तानी हॅकरचा कारनामा

बडे भाई-छोटे भाई हे यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर भरपूर लोकप्रिय आहेत.

Sudesh

तंत्रज्ञान ज्या वेगाने प्रगती होत आहे, त्याच वेगाने हॅकर्स देखील नवनवीन पद्धतींनी लोकांना गंडवण्याच्या पद्धती शोधत आहेत. नुकत्यात समोर आलेल्या एका प्रकरणात गुजरातमधील एका तरुणाला चक्क ७ लाखांना गंडा घातला गेला आहे. यासाठी या तरुणाला आयफोनंच आमिष देण्यात आलं होतं.

अहमदाबादमध्ये राहणाऱ्या विराग दोशी या २४ वर्षीय तरुणासोबत हा प्रकार घडला. त्याला ज्या हॅकरने फोन केला होता, त्याचा फोन नंबर +९२ या कोडने सुरू होत होता. यामुळेच हा हॅकर पाकिस्तानचा असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे.

अशी झाली फसवणूक

मिळालेल्या माहितीनुसार, विराग दोशी यांना १८ एप्रिल रोजी इन्स्टाग्रामवर एक मेसेज आला होता. यामध्ये 'तुम्हाला बडे भाई आणि छोटे भाईकडून मोफत आयफोन १४ मिळणार आहे' असं सांगण्यात आलं होतं. तसंच, यासाठी ३००० रुपयांची टोकन अमाउंट द्यावी लागणार असल्याचं यात म्हटलं होतं.

अत्यंत महागडा आणि लेटेस्ट आयफोन मिळणार असं समजून दोशी यांनी दिलेल्या नंबरवर ३००० रुपये पाठवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना +९२ कंट्री कोड असणाऱ्या एका नंबरवरून फोन आला. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने आपली ओळख 'बडे भाई' अशी सांगितली. तुमचा आयफोन आणि अ‍ॅपल वॉच पॅक झाली आहे. फक्त डिलिव्हरीसाठी तुम्हाला आठ हजार रुपये भरावे लागतील. असं त्याने सांगितलं. (ZamZam iPhone Scam)

यावर विश्वास ठेवत दोशी यांनी आठ हजार रुपये देखील पाठवून दिले. यानंतर ना त्यांना आयफोन मिळाला, ना कुणाचा फोन आला. पुढच्या महिन्यात त्यांनी आपलं बँक अकाउंट तपासलं तेव्हा त्यांना धक्का बसला. १८ एप्रिल ते ७ मे या कालावधीमध्ये टप्प्या-टप्प्याने त्यांच्या खात्यातून ६.७६ लाख रुपये काढण्यात आले होते.

कोण आहेत 'बडे भाई-छोटे भाई'?

बडे भाई-छोटे भाई हे यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत. दुबईमध्ये त्यांचं झमझम नावाचं इलेक्ट्रॉनिक शॉप आहे. सोशल मीडियावर आपल्या व्हिडिओंमध्ये ते कित्येक लोकांना मोफत आयफोन, अ‍ॅपल वॉच आणि इतर महागड्या वस्तू देताना दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'सावरखेड एक गाव' फेम अभिनेत्रीची छोट्या पडद्यावर दणक्यात एंट्री; 'स्टार प्रवाहच्या 'या' मालिकेत साकारणार भूमिका

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

SCROLL FOR NEXT