HALO AI Headband eSakal
विज्ञान-तंत्र

HALO AI Headband : आता स्वप्नांवर राहणार तुमचं नियंत्रण, 'एआय'ची होणार मदत.. हेडबँड कंपनीचा मोठा दावा!

HALO AI हेडबँड हे डिव्हाईस आपल्या मनातील क्रियाकल्पांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एआयचा वापर करतं. यामुळे झोपेत असताना आपल्या स्वप्नांवर नियंत्रण ठेवता येणं शक्य होणार आहे.

Sudesh

Dream Controlling Headband : विज्ञानाने कितीही प्रगती केली, तरी मानवी मन हे संशोधकांना न सुटलेलं कोडंच आहे. त्यातही स्वप्नांबाबत आतापर्यंत कित्येक स्तरांवर संशोधन करण्यात आलं आहे. यातच आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने असा हेडबँड तयार करण्यात आला आहे, जो आपल्या स्वप्नांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करेल. प्रोफेटिक नावाच्या एका कंपनीने हा दावा केला आहे. (Profetic HALO AI Headband)

कसं करतो काम?

HALO AI Headband असं या हेडबँडचं नाव आहे. यामध्ये कित्येक सेन्सर्स देण्यात आले आहेत, जे व्यक्तीच्या ब्रेन अ‍ॅक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवतात. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या सर्व माहितीचं विश्लेषण करते. ही सर्व माहिती तुम्हाला एका अ‍ॅपवर दिली जाईल. यामुळे तुम्हाला आपली अ‍ॅक्टिव्हिटी आरामात ट्रॅक करता येईल.

काय आहेत वैशिष्ट्य?

  • HALO AI हेडबँड हे डिव्हाईस आपल्या मनातील क्रियाकल्पांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एआयचा वापर करतं. यामुळे झोपेत असताना आपल्या स्वप्नांवर नियंत्रण ठेवता येणं शक्य होणार आहे.

  • याव्यतिरिक्त आपली एकाग्रता वाढवण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी देखील या हेडबँडचा वापर केला जाऊ शकतो. यासाठीच्या कमांड्स हा हेडबँड तुम्हाला देऊ शकेल.

  • शांत झोपेसाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो. तुमच्या ब्रेन वेव्ह्ज मोजून, तुम्ही कधी झोपायला हवं आणि कधी उठायला हवं याबाबत हा हेडबँड माहिती देऊ शकतो.

कधी होणार लाँच?

हा हेडबँड अद्याप पूर्णपणे तयार झालेला नाही. यावर सातत्याने रिसर्च आणि चाचण्या सुरू आहेत. यासाठी कंपनी व्हॉलेंटियर्स आणि बीटा यूजर्सचा शोध घेत आहेत. मात्र, लवकरच हा हेडबँड मोठ्या स्तरावर तयार करुन तो लाँच करणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. या हेडबँडची किंमत सुमारे 2,000 डॉलर्स असू शकते असंही मीडिया रिपोर्ट्समध्ये स्पष्ट झालं आहे. (Headband that control Dreams)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, LSG vs GT: जॉस बटलर - शुभमन गिल बरसले, गुजरातचा सलग दुसरा विजय; रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का

Coal Rate: आता वीज बिल वाढणार नाही! कोल इंडियाचा मोठा निर्णय; उद्योग आणि ग्राहकांना मोठा दिलासा

Kagal Traffic Relief Project : पुणे -बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अडीच किमीचा पिलर फ्लायओव्हर, कागल लक्ष्मी टेकडीचे ट्राफिक कायमचे होणार कमी

Breaking News Live Update: संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील एलओपी मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहिले

Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना नसतो सरकारी नोकरीचा योग; तयारीत घालवतात अनेक वर्षे, पण खाजगी क्षेत्रात मिळतं मोठं यश

SCROLL FOR NEXT