Harley Davidson X440 eSakal
विज्ञान-तंत्र

Harley Davidson X440 : 'हार्ले'च्या सर्वात स्वस्त बाईकसाठी करावी लागणार घाई; 'या' दिवशी बंद होणार ऑनलाईन बुकिंग

Harley Davidson Affordable Bike : ऑक्टोबरपासून या गाडीची डिलिव्हरी सुरू होईल.

Sudesh

हार्ले डेव्हिडसन कंपनीने काही दिवसांपूर्वी भारतात आपली नवीन बाईक लाँच केली होती. Harley Davidson X440 असं या बाईकचं नाव आहे. स्वदेशी बनावटीची असलेली ही हार्लेची सर्वात स्वस्त बाईक आहे. 3 जुलैपासून याचं ऑनलाईन बुकिंग सुरू झालं होतं.

ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद

या गाडीला ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. कंपनीकडून अधिकृत आकडेवारी जारी केली नसली, तरीही मोठ्या प्रमाणात बुकिंग झाल्याचं हार्लेने म्हटलं आहे.

ऑनलाईन बुकिंग होणार बंद

सध्या हार्लेच्या ऑफिशिअल वेबसाईटवर आणि हीरो मोटोकॉर्पच्या डीलरशिपकडे तुम्ही या गाडीची बुकिंग करू शकता. यासाठी तुम्हाला 5,000 रुपये बुकिंग अमाउंट द्यावी लागेल. मात्र, तुम्हाला यासाठी घाई करण्याची गरज आहे. कारण, 3 ऑगस्टपासून ऑनलाईन बुकिंग बंद करण्यात येणार असल्याचं कंपनीने जाहीर केलं आहे. (Harley Davidson Bike)

किती आहे किंमत?

हार्ले-डेव्हिडसनची ही गाडी तीन व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. यातील बेस व्हेरियंटची किंमत 2.29 लाख रुपयांपासून (एक्स शोरुम) सुरू होते. 400 सीसी क्षमतेच्या इतर गाड्यांच्या तुलनेत ही किंमत अगदीच परवडणारी आहे. शिवाय, हार्ले-डेव्हिडसन ही एक प्रतिष्ठित कंपनी आहे. यामुळेच या गाडीला जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

ऑक्टोबरपासून डिलिव्हरी

ज्या ग्राहकांनी प्री-बुक केलं आहे, त्यांना सप्टेंबर महिन्यापासून या गाडीची टेस्ट ड्राईव्ह करण्याची संधी मिळेल. ऑक्टोबर महिन्यापासून या गाडीची डिलिव्हरी करण्याचा कंपनीचा मानस आहे. प्रायोरिटी बेसिसवर ग्राहकांना डिलिव्हरी मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : नागपुरात मारबत उत्सवाला सुरुवात...

Airtel Recharge : एअरटेलचा पुन्हा धक्का! 'या' रिचार्ज प्लॅनचे दर झाले कमी, पण ग्राहक का नाराज? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT