Buy A New Car  esakal
विज्ञान-तंत्र

Buy A New Car : दिवाळीत नवी गाडी घ्यायचा अचानक प्लॅन झाला असेल तर काळजी करू नका, या गाड्यांची डिलिव्हरी लवकर मिळेल

ज्याला नवीन कार घ्यायची असेल आणि त्याची डिलिव्हरी दिवाळीत व्हावी असे वाटणारे आगाऊ कार बुक करतात

सकाळ डिजिटल टीम

Buy A New Car : तुम्हाला कोणतीही नवीन वस्तू घ्यायची असेल किंवा कोणत्याही नवीन वस्तूची डिलिव्हरी घ्यायची असेल, प्रत्येकजण शुभ मुहूर्त शोधत असतो. त्यामुळे ज्याला नवीन कार घ्यायची असेल आणि त्याची डिलिव्हरी दिवाळीत व्हावी असे वाटणारे आगाऊ कार बुक करतात. पण जर तुम्ही अचानक नवीन कार घेण्याचा विचार केला तर तुम्हाला लगेच डिलिव्हरी कशी मिळेल?

आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहोत.तुम्हाला माहिती असेलच की, मारुती, टाटा, ह्युंदाई, महिंद्रा आणि किया यांसारख्या कंपन्यांचे अनेक मॉडेल्स आहेत जे ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. लोकप्रिय मॉडेल्सना डिलिव्हरीसाठी बराच वेळ वाट पाहावी लागते.

अशा प्रकारे तुम्हाला त्वरित डिलिव्हरी मिळेल

बाजारपेठेत ग्राहकांमध्ये जास्त मागणी असलेल्या कारची तात्काळ डिलिव्हरी मिळणे शक्य नाही, परंतु ज्या मॉडेलची मागणी जास्त नाही अशा मॉडेलची कार त्वरित डिलिव्हरीसह मिळू शकते.काही काळापूर्वी एका अहवालात समोर आले होते की मारुती सुझुकीकडे असे चार मॉडेल्स आहेत जे तात्काळ डिलिव्हरीसह उपलब्ध आहेत, या वाहनांची नावे होती मारुती सुझुकी सेलेरियो, स्विफ्ट, वॅगनआर आणि एस प्रेसो.

दुसरीकडे, इतर कंपन्यांचे अनेक मॉडेल्स असतील ज्यांची मागणी कमी आहे. जर तुम्ही असेमॉडेल्स निवडले तर तुम्हाला जलद वितरणाचा लाभ घेता येईल.हेच नवीन कार्ससाठी डिलिव्हरी टाईम जास्त आहे दुसरीकडे, जर एखाद्या मॉडेलची मागणी असेल परंतु तुम्हाला ते त्वरित हवं असेल, तर तुम्ही वापरलेल्या कारची विक्री करणाऱ्या प्लॅटफॉर्मवर वळू शकता. येथे तुम्हाला तुमची आवडती कार मागणी असूनही त्वरित मिळेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की वाहनाच्या कागदपत्रांची पडताळणी केल्याशिवाय पैसे देऊ नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT