Headphone Technology esakal
विज्ञान-तंत्र

Headphone Technology : 50 तासांचा बॅटरी बॅकअप असलेला पहिला वायरलेस हेडफोन अवघ्या 1,499 रुपयात

नॉईज या हेडफोनच्या कंपनीने भारतात 'नॉईज टू' नावाचे वायरलेस हेडफोन लाँच केले

सकाळ डिजिटल टीम

Headphone Technology : नॉईज या हेडफोनच्या कंपनीने भारतात 'नॉईज टू' नावाचे वायरलेस हेडफोन लाँच केलेत. विशेष म्हणजे याला 50 तासांचा बॅटरी बॅकअप आहे. आणि हेडफोनची किंमत फक्त 1,499 रुपये इतकी आहे.

तुम्ही हा हेडफोन गो-नॉईज, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि मिंत्रा या ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट वरून खरेदी करू शकतात. हा कंपनीचा तिसरा हेडफोन असून तो नॉइज वनचा सक्सेसर म्हणून सादर करण्यात आलाय.

या हेडफोन मध्ये बोल्ड ब्लॅक, कॅम व्हाईट आणि सेरेन ब्लू हे कलर ऑप्शन उपलब्ध आहेत. कंपनीचं म्हणणं आहे की हेडफोन कपमध्ये सॉफ्ट पॅडिंग आहे, ज्यामुळे युजर्स जास्त वेळ हेडफोन वापरू शकतात.

नॉईज टू एंट्री-लेव्हल युजर्ससाठी डिझाइन करण्यात आलाय. त्यामुळे यात हेडफोन अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन आणि लॉसलेस ऑडिओ यासारखे हाय-एंड फीचर्स मिळत नाहीत. नॉईज कंपनीच्या म्हणण्यानुसार नॉईज टू हा एंट्री-लेव्हल हेडफोन आहे आणि युजर्स ब्लूटूथद्वारे कोणत्याही स्मार्टफोन, टॅबलेट किंवा पीसीला कनेक्ट करू शकतात.

विशेष म्हणजे या ओव्हर-इअर हेडफोन्स मध्येकोणत्याही अडथळ्याशिवाय 40ms लो लेटेन्सी सोबत 50 तासांचा प्लेटाईम मिळतो.लॅपटॉप आणि फोनला सोबतच कनेक्ट करता येईल. याशिवाय यात आणखीन एक खास फिचर आहे ते म्हणजे ड्युअल पेअरिंग मोड सपोर्ट. यात युजर हेडफोन एकाचवेळी फोन आणि लॅपटॉपला कनेक्ट करू शकतात. नॉइज टू ला वॉटर रेझिस्टन्ससाठी IPX5 रेटिंग आहे. म्हणजे तुम्ही जिम मध्ये घाम गाळताना सुद्धा हा हेडफोन घालू शकता.

हा हेडफोन प्लॅस्टिक बॉडीसह येतो, त्यामुळे हेडफोन कानात घालताना सोपं पडतं. पण प्लॅस्टिक बॉडीमुळे हा हेडफोन मजबूत असेल का ? असे ही प्रश्न विचारले जात आहेत. यात ऍडिशनल फीचर्स बद्दल बोलायचं झाल्यास हा हेडफोन चार प्ले मोडला सपोर्ट करतो, ज्यात ब्लूटूथ, AUX, SD कार्ड आणि FM चा समावेश आहे. हेडफोन्समध्ये चार्जिंगसाठी टाइप-सी पोर्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: शुभमन गिल टीम इंडियासोबत दुसऱ्या कसोटीसाठी प्रवास करणार की नाही? अखेर BCCI नेच दिले अपडेट

Viral News : ऑफिसमध्ये मॅनेजर बनायचा हिटलर! सुट्टी-वर्क फ्रॉम होमवर विचारायचा शंभर प्रश्न; वैतागून तरुणाने केला धक्कादायक प्रकार

Latest Marathi Breaking News Live Update : 26 तारखेच्या बैठकीत युवा स्वाभिमान पार्टीची भूमिका स्पष्ट करू - नवनीत राणा

Satara Politics:'भाजपचा सातारा नगरपालिकेत महाविकास आघाडीला दणका'; आशा पंडित बिनविराेध विजयी..

Kolhapur Election: कोल्हापुरात निष्ठेला तिलांजलि, संधिसाधू राजकारणाची परंपरा जुनीच; मुश्रीफ-घाटगे युतीमुळे पुन्हा चर्चा

SCROLL FOR NEXT