E-Cigarette Ban eSakal
विज्ञान-तंत्र

E-Cigarette Ban : ई-सिगारेट विकणाऱ्या १५ वेबसाईट्सना आरोग्य मंत्रालयाची नोटीस; सोशल मीडियावर करडी नजर

या वेबसाईट्सना उत्तर देण्यासाठी ३६ तासांची मुदत देण्यात आली आहे.

Sudesh

ई-सिगारेटची विक्री करणाऱ्या १५ वेबसाईट्सना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नोटीस बजावली आहे. ई-सिगारेट भारतात बॅन असल्यामुळे, त्याची विक्री करणे बेकायदेशीर आहे. यासंदर्भात आणखी सहा वेबसाईट्स रडारवर असून, मंत्रालय सोशल मीडियावर देखील नजर ठेऊन असणार आहे.

पीटीआयने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. या १५ वेबसाईट्सपैकी चार वेबसाईट्सनी ई-सिगारेटची विक्री बंद केली असून, इतरांनी अद्याप नोटीसला उत्तर दिलं नसल्याचं एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितलं.

"तुमच्या वेबसाईटवर ई-सिगारेट बाबत जाहिरात आणि विक्री सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. ई-सिगारेट प्रतिबंध कायद्या अंतर्गत हे बेकायदशीर आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे पुराव्याला धक्का न पोहचवता अशा प्रकारची माहिती वेबसाईटवरुन काढून टाकावी" असे या वेबसाईटना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

"जर त्यांनी वेळेत उत्तर दिलं नाही, आणि कायद्याचे पालन केले नाही, तर आरोग्य मंत्रालय याबाबत इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मंत्रालयाला या वेबसाईट बंद करण्याचे निर्देश देईल. तसेच, या वेबसाईटवर कायदेशीर कारवाई देखील करण्यात येईल", असं या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.

नोटीस मिळाल्यापासून ३६ तासांमध्ये उत्तर देण्याचे निर्देश या वेबसाईट्सना देण्यात आले आहेत. यातील चार कंपन्यांनी उत्तर दिलं असून, बाकीच्यांच्या उत्तराची प्रतीक्षा आम्ही करत आहोत, असं या अधिकाऱ्याने सांगितलं. यासोबतच, सोशल मीडियावर पोस्ट होत असलेल्या ई-सिगारेटच्या जाहिरातींवरही मंत्रालयाचं लक्ष असल्याचं या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

Velhe Fire : भीषण आगीत चार सख्ख्या भावांची घरे भस्मसात; सुदैवाने जीवितहानी टळली

SCROLL FOR NEXT