Hero Mavrick 440 eSakal
विज्ञान-तंत्र

Hero Mavrick 440 : हीरोने लाँच केली आतापर्यंतची सर्वात प्रीमियम बाईक; रॉयल एनफील्डला देणार टक्कर .. किती आहे किंमत?

Hero Premium Bike : हार्लेवर आधारीत असली, तरी या बाईकचं इंजिन हे थोडंफार बदलण्यात आलं आहे. या इंजिनची क्षमता 440cc आहे.

Sudesh

Hero 440cc bike : हीरो मोटोकॉर्पने भारतातील आपली सगळ्यात प्रीमिमय बाईक आज लाँच केली आहे. हीरो मावरिक 440 असं या बाईकचं नाव आहे. ही बाईक हार्ले डेव्हिडसन X440 या बाईकवर आधारित आहे. याची थेट टक्कर रॉयल एनफील्ड क्लासिक 350, ट्रायम्फ स्पीड 400, जावा 350 आणि होंडा सीबी 350 या गाड्यांशी असणार आहे.

हार्लेवर आधारीत असली, तरी या बाईकचं इंजिन हे थोडंफार बदलण्यात आलं आहे. या इंजिनची क्षमता 440cc आहे. हे सिंगल-सिलेंडर इंजिन 27hp आउटपुट देतं. याचा टॉर्क 36Nm आहे. (Hero Mavrick 440 Engine)

या बाईकमध्ये 6-स्पीड गिअरबॉक्स दिला आहे. यात स्लिप-एंड-असिस्ट क्लच मिळतो. या बाईकची चाकं 17 इंचाची आहेत. यामध्ये मस्क्युलर लुक असणारा टँक आहे. बाईकचं डिझाईन अग्रेसिव्ह रोडस्टर प्रकारातील आहे.

फीचर्स

यामध्ये 43mm टेलिस्कोपिक फोर्क वापरण्यात आला आहे. यात 320mm फ्रंट आणि 240mm रिअर डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. बाईकमध्ये पूर्ण लायटिंग सेटअप दिला आहे. हेडलँपचा आकार गोल आहे. डिजिटल स्पीडोमीटरमध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, गिअर इंडिकेटर असे फीचर्स आहेत.

किंमत

या बाईकचे तीन व्हेरियंट लाँच करण्यात आले आहेत. यातील बेस व्हेरियंटची किंमत 1,99,000 रुपये असणार आहे. तर मिड व्हेरियंटची किंमत 2,14,000 रुपये असेल. टॉप व्हेरियंटची किंमत 2,24,000 असणार आहे. या सर्व किंमती एक्स शोरूम आहेत. हीरोची ही सगळ्यात महागडी गाडी असली, तरी या सेगमेंटमधील इतर बाईक्सच्या तुलनेत हीरो चांगली किंमत ऑफर करत आहे. (Hero Mavrcik 440 Price)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress review meeting chaos : बिहार निवडणुकीत दारुण पराभवामुळे दिल्लीत काँग्रेसच्या आढावा बैठकीत गोंधळ; नेत्यांमध्ये जोरदार वाद!

Santosh Deshmukh Case: फरार कृष्णा आंधळेच्या शोधाबाबत अहवाल सादर करा; न्यायालयाच्या सूचना; १२ डिसेंबरला आरोप निश्‍चिती शक्य

Pune Police : आंदेकर टोळीने उमरटीतून १५ पिस्तुले विकत घेतली;टोळीवर आणखी एक गुन्हा दाखल होणार!

Ghodegaon Theft : घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या चोरीप्रकरणी दोन आरोपी अटकेत!

Pune New Police Stations : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ; शहरात पाच नवीन पोलिस स्टेशन्स वाढणार, जाणून घ्या कुठे?

SCROLL FOR NEXT