Hero Bike Sakal
विज्ञान-तंत्र

Hero MotoCorp: हीरोने दिला ग्राहकांना झटका, स्वस्त वाहन खरेदीची शेवटची संधी; किंमतीत होणार मोठी वाढ

हीरो मोटोकॉर्प उद्यापासून आपल्या दुचाकी वाहनांच्या किंमतीत मोठी वाढ करणार आहे. वाढ झालेली किंमत मॉडेलनुसार वेगवेगळी असेल.

सकाळ डिजिटल टीम

Hero MotoCorp Price Hike: हीरो मोटोकॉर्प आपल्या ग्राहकांना मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे. कंपनी १ डिसेंबर २०२२ पासून दुचाकी वाहनांच्या किंमतीत वाढ करणार आहे. कंपनी आपल्या बाईक आणि स्कूटरच्या किंमतीत १५०० रुपयांपर्यंत वाढ करणार आहे. वाढ झालेली किंमत ही मॉडेलनुसार वेगवेगळी असेल.

हेही वाचा: भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

त्वरित खरेदी करा दुचाकी

तुम्ही जर ३० नोव्हेंबरला दुचाकी खरेदी करत असाल तर जास्त किंमत द्यावी लागणार नाही. याआधी देखील भारतातील सर्वात मोठी दुचाकी निर्माता कंपनीने वाहनांच्या किंमतीत वाढ करत मोठा झटका दिला होता. कंपनीने नववर्षाच्याआधी गाड्यांच्या किंमतीत वाढ करत ग्राहकांना झटका दिला आहे. कंपनीने नवरात्रीच्याआधी देखील किंमतीत वाढ केली होती. ग्राहकांना कंपनीच्या गाड्या खरेदी करण्यासाठी १ हजार रुपये जास्त द्यावे लागत आहे.

हीरोने यावर्षी एप्रिल आणि त्याआधी जानेवारी महिन्यात गाड्यांची किंमत वाढवली होती. कंपनीने आपल्या गाड्यांच्या किंमतीत आतापर्यंत ३ ते ४ हजार रुपये वाढ केलीये.

किंमत वाढण्याचे हे आहे कारण

Hero MotoCorp चे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) निरंजन गुप्ता यांनी किंमती वाढवण्याचे कारण सांगितले आहे. गुप्ता यांच्यानुसार, एकूण उत्पादन खर्च लक्षात घेता बाईक आणि स्कूटरच्या किंमती वाढवणे आमच्यासाठी अनिवार्य झाले होते.

ग्राहकांवर खर्चाचा बोजा पडू नये यासाठी वेगवेगळ्या वित्तीय सुविधा देखील देऊ. ग्राहकांचा अतिरिक्त खर्च कमी व्हावा यासाठी वेगवेगळे बचत कार्यक्रम देखील सुरू केले आहेत. आर्थिक वाढ ही मागणीच्या दृष्टीने अनुकूल असून, पुढील तिमाहीत मागणीत वृद्धी होण्याची देखील शक्यता आहे, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT