Holi 2024  esakal
विज्ञान-तंत्र

Holi 2024 : रंग खेळताना चुकून पाण्यात फोन पडला; तर वेळ न घालवता लगेच फॉलो करा ही ट्रिक

चुकून तुमचा फोन पाण्यात किंवा चिखलात पडला तर काय कराल? तेव्हा या काही टिप्स अशावेळी तुमच्या कामी येऊ शकतात

सकाळ ऑनलाईन टीम

How to dry wet Smartphone : भारतात होळी हा सण दणक्यात साजरा केला जातो. प्रत्येकाची होळी खेळण्यची पद्धत सुद्धा वेगळी आहे. काहींना फक्त रंगांची होळी खेळायला आवडते तर काहींना पाण्याची होळी खेळायला आवडतं. अनेक ठिकाणी तर चिखलात माखून होळी खेळली जाते. महाराष्ट्रात कित्येक ठिकाणी आता होळी आणि रंगपंचमी अशा दोन्ही दिवशी रंग खेळले जातात. अशात चुकून तुमचा फोन पाण्यात किंवा चिखलात पडला तर काय कराल? तेव्हा या काही टिप्स अशावेळी तुमच्या कामी येऊ शकतात.

फोन पाण्यात पडला तर काय करावे?

तुमचा फोन पाण्यात पडला असेल किंवा ओला झाला असेल तर तो ताबडतोब बंद करा. फोन बंद नसल्यास शॉट सर्किट होऊ शकते. या प्रकरणात, त्याचे कोणतेही बटण काम करत आहे की नाही हे तपासण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही ते लगेच बंद करा.

फोन बंद केल्यानंतर, त्याचे सर्व सामान वेगळे करा. शक्य असल्यास, बॅटरी किंवा सिम कार्ड आणि मेमरी कार्ड वेगळे करा आणि कोरड्या टॉवेलवर ठेवा. असे केल्याने शॉर्ट सर्किटचा धोका कमी होईल. (Mobile fell in water)

फोनचे अॅक्सेसरीज वेगळे केल्यानंतर तुम्हाला फोनचे सर्व भाग सुकवावे लागतील. यासाठी तुम्ही पेपर नॅपकिन वापरू शकता. याशिवाय मऊ टॉवेल वापरूनही फोन सुकवता येतो.

बाहेरून कोरडे केल्यानंतर, फोन आतून सुकणे देखील आवश्यक आहे. यासाठी फोन एका भांड्यात कोरड्या तांदळात दाबून ठेवा. तांदूळ ओलावा लवकर सोकण्याचे काम करतो. याशिवाय जर तुमच्याकडे सिलिका जेल पॅक असेल तर तुम्ही ते वापरू शकता. सिलिका जेल पॅक शू बॉक्स किंवा गॅझेट बॉक्स इत्यादींमध्ये ठेवले जातात. (Technology) ते भातापेक्षा जास्त ओलावा शोषून घेतात. तुम्हाला फोन किमान 24 तास सिलिका पॅक किंवा तांदळाच्या भांड्यात ठेवावा लागेल.

24 तासांनंतर फोन आणि फोनचे सर्व भाग कोरडे झाल्यावर ते चालू करा. जर फोन आता चालू होत नसेल तर तो सर्व्हिस सेंटरला घेऊन जा. (Smartphone drying tips)

या गोष्टी आवर्जून टाळा

फोन पाण्यात पडला असेल तर तो ड्रायरने सुकवण्याचा प्रयत्न करू नका. ड्रायरमधील गरम हवा फोनचे सर्किट वितळवू शकते. जर फोन ओला असेल तर त्याचे बटण वापरू नका कारण यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका वाढतो. फोन पूर्णपणे कोरडा होईपर्यंत फोनचा हेडफोन जॅक आणि यूएसबी पोर्ट वापरू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajinkya Rahane चा अजित आगरकरच्या निवड समितीवर निशाणा; स्पष्ट शब्दात सांगितलं ऑस्ट्रेलियात टीम इंडियाला माझी गरज होती पण...

Saswad Heavy Rain: सासवड जेजुरी पालखी मार्ग जलमय; खळद, शिवरी येथे अर्धा तास मुसळधार पाऊस

IND vs SA Test Series: तो परत आला...! भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा; ३ फिरकीपटूंचा समावेश

Bacchu Kadu: जातीपातीच्या भांडणांमध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न हरवला: बच्चू कडू; शेतकऱ्यांचा ‘आसूड मेळावा’; सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल

Latest Marathi News Live Update :निलेश घायवळ टोळीतील फरार आरोपी बबलू सुरवसेला सांगलीतून अटक

SCROLL FOR NEXT