honda activa 125 premium edition google
विज्ञान-तंत्र

Honda Activa 125 प्रीमियम एडिशन भारतात लाँच; पाहा किंमत-फीचर्स

सकाळ डिजिटल टीम

Honda ने मंगळवारी भारतीय बाजारात नवीन Activa Premium Edition स्कूटर लॉन्च करण्याची घोषणा केली. नवीन स्कूटर दोन ड्युअल टोन कलर ऑप्शन्समध्ये लॉंच करण्यात आली आहे, Activa125 ही BSVI असलेली भारतीय टू-व्हीलर मार्केटमधील पहिली स्कूटर होती आणि ती अनेक सेगमेंट-फर्स्ट फीचर्ससह आली होती. Activa 125 प्रीमियम एडीशन 2 ड्युअल टोन कलर पर्यायांमध्ये लॉन्च केले गेले आहे - मॅट मॅग्निफिशेंट कॉपर मेटॅलिकसह पर्ल अमेझिंग व्हाइट आणि मॅट अर्ल सिल्व्हर मेटॅलिकसह मॅट स्टील ब्लॅक मेटॅलिक हे दोन करल ऑप्शन्स ग्राहकांना मिळणार आहेत.

फीचर्स काय आहेत?

Activa 125 Premium Edition ड्युअल टोन बॉडी कलरसह येते. तसेच प्रीमियम एडिशनमध्ये ब्लॅक इंजिनसोबत ब्लॅक फ्रंट सस्पेंशन देण्यात आले आहे. खास पध्दतीने डिझाइन केलेल्या एलईडी हेडलॅम्पमुळे ड्युअल टोन कलर्स उठून दिसत आहेत सोबतच त्यामुळे स्कूटरला बोल्ड लुक देखील मिळाला आहे. Activa 125 Premium Edition ला बॉडी कलर ग्रॅब रेल आणि प्रीमियम ग्राफिक्ससह स्टायलिश टेल लॅम्प देण्यात आले आहेत.

किंमत किती असेल?

Honda Motorcycle & Scooter India चे व्यवस्थापकीय संचालक अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, अत्सुशी ओगाटा यांनी सांगीतले की, नवीन Activa 125 Premium Edition आपल्या प्रीमियम अपीलसह ग्राहकांना उत्साहित करण्यासाठी सज्ज आहे. तर लाखो भारतीयांचा खरा साथीदार म्हणून, अॅक्टिव्हाने देशभरातील टुव्हिवर ग्राहकांच्या गरजा पूर्ण केल्या आहेत असे मत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे संचालक दविंदर सिंग गुलेरिया यांनी व्यक्त केले. Activa 125 प्रीमियम एडिशन ड्रम अलॉय स्कूटरची किंमत ही 78725 निश्चिच करण्यात आली आहे तसेच डिस्क व्हेरिएंटची किंमत 82280 रुपये इतकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Pune Metro Route : विमानतळ-कल्याणीनगर मेट्रोमार्ग निश्‍चित; सुरळीत वाहतुकीसाठी पौडफाटा ते वनदेवी होणार दुहेरी उड्डाणपूल

Temple Fund Projects: हिंदू मंदिरांच्या पैशातून मॉल्स अन् हॉल्स बांधू नका, भाविकांसाठी खर्च करा... CM Vijay ने ४६ प्रकल्प केले रद्द

SCROLL FOR NEXT