Honor Magic 6 Pro eSakal
विज्ञान-तंत्र

MWC Honor Magic 6 Pro : केवळ डोळ्यांनी कंट्रोल करता येणार कार; खास फीचर असणारा ऑनरचा स्मार्टफोन

MWC 2024 : या फोनच्या डिस्प्लेचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये Nano Crystal Shield कव्हर देण्यात आलंय. तसंच याला स्क्रॅचप्रूफ बनवण्यासाठी त्यावर सिलिकॉन नायट्रेट कोटिंगही दिलं आहे.

Sudesh

Honor Magic 6 Pro at MWC 2024 : चिनी स्मार्टफोन कंपनी ऑनरने मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये आपला नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. Honor Magic 6 Pro या स्मार्टफोनचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये असणारं एआय आय-ट्रॅकिंग फीचर. या फीचरच्या मदतीने यूजर्स केवळ फोनच्या स्क्रीनकडे बघून आपली कारही कंट्रोल करू शकणार आहेत.

ऑनर मॅजिक 6 प्रो हा स्मार्टफोन चीनमध्ये यापूर्वीच लाँच करण्यात आला आहे. आता MWC 2024 मध्ये याचं ग्लोबल लाँचिंग होणार आहे. याची किंमत कंपनीने 1,299 युरो एवढी निश्चित केली आहे. भारतीय रुपयांमध्ये ही किंमत 1,16,500 रुपये आहे. अर्थात, हा फोन भारतात कधी लाँच होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

फीचर्स

या स्मार्टफोनमध्ये 6.8 इंच मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये फुल HD रिझॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट दिला आहे. या फोनच्या डिस्प्लेचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये Nano Crystal Shield कव्हर देण्यात आलंय. ही नव्या प्रकारची काच आहे जी इतर स्मार्टफोन डिस्प्लेच्या तुलनेत 10 पट अधिक मजबूत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यासोबतच स्क्रीनला स्क्रॅचप्रूफ बनवण्यासाठी त्यावर सिलिकॉन नायट्रेट कोटिंगही दिलं आहे.

या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट देण्यात आलाय. तसंच याच्या टॉप मॉडेलमध्ये 1TB स्टोरेज आमि 16GB रॅम देण्यात आली आहे. Honor Magic 6 Pro फोनमध्ये 5,600 mAh एवढी तगडी बॅटरी दिली आहे, जी 80W वायर्ड आणि 60W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आलाय. यातील प्रायमरी सेन्सर 50MP क्षमतेचा आहे. सोबत यामध्ये 50MP अल्ट्रावाइड लेन्स आणि 180MP क्षमतेचा पेरिस्कोप लेन्स देण्यात आला आहे. यामध्ये 50MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

Stock Market Opening: शेअर बाजाराची सपाट सुरुवात; सेन्सेक्स 34 अंकांनी घसरला, बाजारात दबाव का दिसून येत आहे?

Tulsi Water Benefits: सकाळी तुळशीचे पाणी प्यायल्याने पावसाळ्यात 'या' 4 आजारांवर होईल मात

मराठमोळ्या गाण्यावर सोनालीचे इंग्लंडमध्ये ठुमके, कवितेवर केला हटके डान्स, व्हिडिओ व्हायरल

दादरची 'ती' ओळख होणार इतिहासजमा! अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेल्या कबुतरखान्याचा शेवटचा Video व्हायरल, लोक हळहळले

SCROLL FOR NEXT