Honor X9b Launch Date eSakal
विज्ञान-तंत्र

Honor X9b : आता मोबाईल फुटणारच नाही? स्क्रीनमध्ये मिळणार चक्क 'एअरबॅग' टेक्नॉलॉजी, कधी होणार लाँच?

The 'airbag' technology will be available in the smartphone: ऑनर एक्स 9b हा स्मार्टफोन अगदी मजबूत असणार आहे. कंपनीचे भारतातील प्रमुख माधव शेठ यांनी यापूर्वी हा स्मार्टफोन वेगवेगळ्या उंचीवरुन खाली आपटून दाखवला होता.

Sudesh

Honor X9b Airbag Technology : ऑनर कंपनी भारतात आणखी एक दमदार स्मार्टफोन लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनी आतापर्यंतचा सगळ्यात मजबूत स्मार्टफोन लाँच करणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून कंपनी आपल्या नव्या स्मार्टफोनला टीझ करत आहे. आता याबाबत आणखी एक खास बाब समोर आली आहे. या स्मार्टफोनमध्ये चक्क एअरबॅग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.

ऑनरच्या या नवीन स्मार्टफोनचं नाव Honor X9b असं आहे. यासोबतच कंपनी आपले इअरबड्स आणि एक स्मार्टवॉच देखील लाँच करणार आहे. या सगळ्यांची लाँच डेट कंपनीने कन्फर्म केली आहे. (Honor X9b Launch Date)

तगडा आहे स्मार्टफोन

ऑनर एक्स 9b हा स्मार्टफोन अगदी मजबूत असणार आहे. कंपनीचे भारतातील प्रमुख माधव शेठ यांनी यापूर्वी हा स्मार्टफोन वेगवेगळ्या उंचीवरुन खाली आपटून दाखवला होता. तसंच या स्मार्टफोनवरुन चक्क थार ही चारचाकी गाडीदेखील नेऊन दाखवली होती. तरीही या स्मार्टफोनला स्क्रॅचही आला नसल्याचं व्हिडिओत दिसत होतं. (Honor X9b Strength)

एअरबॅग टेक्नॉलॉजी

कंपनीने आपल्या एक्स पोस्टमध्ये एअरबॅग टेक्नॉलॉजीचा उल्लेख केला आहे. हा भारतातील पहिला अशा स्मार्टफोन असणार आहे ज्याला एअरबॅग टेक्नॉलॉजी युक्त अल्ट्रा बाऊन्स डिस्प्ले देण्यात येईल. त्यामुळे आता टेम्पर्ड ग्लासला विसरून जा, असं कंपनीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कधी होणार लाँच?

याच पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 15 फेब्रुवारी 2024 रोजी हा स्मार्टफोन लाँच होणार आहे. लीक्समध्ये मिळालेल्या माहितीनुसार या स्मार्टफोनची किंमत 25 ते 30 हजारांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

'आलमट्टी'ची उंची वाढविल्यास सांगली-कोल्हापूरला धोका नाही, महाराष्ट्र सरकार विनाकारण गोंधळ करून घेतंय; आमदाराचं मोठं विधान

Latest Maharashtra News Updates : ठाकरे मेळाव्यावर मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

SCROLL FOR NEXT