how to download whatsapp video status follow easy tips Marathi article
how to download whatsapp video status follow easy tips Marathi article 
विज्ञान-तंत्र

WhatsApp स्टेटस डाऊनलोड करण्याचा सोपा मार्ग, जाणून घ्या सविस्तर

सकाळ डिजिटल टीम

पुणे : बरेच लोक व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवतात आणि प्रत्येकजण आपापल्या आवडीची स्टेटस ठेवतो. परंतु जर तुम्हाला एखादी व्यक्ती, मित्र किंवा नातेवाईक यांचे स्टेटस आवडले तर  तो व्हिडीओ किंवा फोटो तुम्हाला त्यांच्याकडून मागून घ्यावा लागतो. आज आपण काही टिप्स जाणून घेणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्हाला आवडलेले एखादे स्टेटस तुम्ही स्वतःच डाउनलोड करू शकाल आणि त्यासाठी तुम्हाला दुसरे कुठल्याही अॅपची आवश्यकता देखील पडणार नाही. 

कोणतेही व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस डाउनलोड करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ते रेकॉर्ड करा. त्यासाठी आपण स्क्रीन रेकॉर्डर वापरू शकता, जे काही स्मार्टफोनमध्ये डीफॉल्ट देण्यात आलेले असते, ते वापरुन अगदी सहज तुम्ही कोणाचेही स्टेटस डाऊनलोड करु शकताा. जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये स्क्रीन रेकॉर्डर नसल्यास आपण गूगल प्ले स्टोअर वरून कोणताही स्क्रीन रेकॉर्डर अ‍ॅप डाउनलोड करू शकता. 

सर्व व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स कसे पाहाल

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये बरेच स्टिकर्स देण्यात आले आहेत आणि जर तुम्हाला एखादे स्टिकर शोधायचे असेल तर ते चॅट सुरु असता शोधणे अवघड आहे. मात्र तुम्ही एकाच ठिकाणी सर्व स्टिकर्स पाहू शकता. यासाठी फाईल मॅनेजर वर जा आणि सेटिंग्जमध्ये जाऊन show hidden system files एनेबल करा. नंतर पुन्हा फाइल मॅनेजर मध्ये जा आणि इंटरनल मेमरीवर सलेक्ट करा. येथे तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपचा पर्याय मिळेल. त्यातील मीडिया निवडा आणि व्हॉट्सअॅप स्टिकरवर क्लिक करा. त्यामध्ये आपल्याला आपण वापरलेले सर्व स्टिकर्स एकाच ठिकाणी सापडतील. 

फाइल मॅनेजरमध्यून डिलट करणे सोपे

इतकेच नाही तर आपण आपल्याला आलेले सर्व व्हिडिओ आणि फोटो देखील येथे पाहू शकता आणि आपण त्यास लगेच डिलीट देखील करु शकता.  बर्‍याच लोकांच्या फोनमध्ये, व्हॉट्सअॅपमुळे मेमरी लवकर फुल होते, अशा प्रकारे ते वापरकर्त्याच्या फाइल मॅनेजरमध्ये जाऊन अनावश्यक फोटो आणि व्हिडिओ सहजपणे डिलीट करु शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

MI Playoffs Chances : बुडत्या मुंबईचं थालाच्या चेन्नईकडे लक्ष! MI फॅन्स निराश होऊ नका... अजूनही होता येईल क्वालिफाय?

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

SCROLL FOR NEXT