Fridge Tips eSakal
विज्ञान-तंत्र

Fridge Tips : भिंतीपासून किती दूर असावा फ्रीज? लाखो लोक करतात 'ही' मोठी चूक; तुम्ही नका करू

Refrigerator Tips : फ्रीज भिंतीला टेकून ठेवल्यामुळे लाईट बिल जास्त येतं, असं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.

Sudesh

घरामध्ये फ्रीज असणं ही एकेकाळी चैन मानली जायची. मात्र, आता फ्रीज ही गरज बनली आहे. त्यामुळे लाखो घरांमध्ये आजकाल फ्रीज असतोच. बहुतांश लोक किचनमध्ये एका कोपऱ्यात, किंवा विशिष्ट ठिकाणी फ्रीज ठेवतात. जवळपास सर्वच लोक आपला फ्रीज भिंतीला टेकून ठेवतात. मात्र, हे चुकीचं असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

काय होतं नुकसान?

फ्रीज भिंतीला टेकून ठेवल्यामुळे लाईट बिल जास्त येतं, असं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे. आतले पदार्थ थंड ठेवण्यासाठी फ्रीजच्या मशीनला मोठ्या प्रमाणात एनर्जी वापरावी लागते. या प्रक्रियेत फ्रीज अगदी गरम होतो. ही हीट फ्रीजच्या मागे असलेल्या ग्रिलच्या माध्यमातून बाहेर पडते.

जेव्हा फ्रीज भिंतीला टेकून ठेवलेला असतो, तेव्हा फ्रीजमधून हीट बाहेर पडण्यास अडथळा येतो. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूमधून हीट बाहेर पडणं हे ती वस्तू सुस्थितीत राहण्यासाठी गरजेचं असतं. फ्रीजमधून हीट बाहेर न पडल्यास, आतील पदार्थ थंड ठेवण्यासाठी त्याला आणखी एनर्जी खर्च करावी लागते. यामुळेच विजेचा जास्त वापर होतो.

किती दूर ठेवावा फ्रीज?

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील फ्रीज हा भिंतीपासून सुमारे 6 ते 10 इंच दूर ठेवावा. यामुळे फ्रीजमधील हीट बाहेर पडण्यासाठी पुरेशी जागा मिळते, आणि फ्रीज ओव्हरहीट होऊन खराब होण्याचा धोका टळतो.

अशी घ्या खबरदारी

फ्रीजचं आयुष्य वाढावं यासाठी आणखी एक गोष्ट करणं गरजेचं आहे, ती म्हणजे फ्रीजजवळ हीटर, मायक्रोवेव्ह अशा गोष्टी ठेऊ नयेत. या गोष्टींमधून बाहेर पडणाऱ्या हीटमुळे देखील फ्रीजचं आयुष्य कमी होऊ शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup IND vs NAM :६,६,६,६,४! इशान किशनचे २० चेंडूंत अर्धशतक, संजू सॅसमननेही ३०० च्या स्ट्राईक रेटने चोपल्या धावा...

Abhishek Sharma Health Update: अभिषेक संघासोबत स्टेडियममध्ये दिसला, पण का नाही खेळला? पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांची पुण्यासाठी पहिलीच डीपीसी बैठक; १ हजार ३२ कोटींच्या विकासकामांना मंजुरी

Latest Marathi News Live Update : अल्पवयीन मुलीचा छळ करणाऱ्या आरोपीस कोर्टात आणताना महिलांनी चोपले

जिनिलियाला पहिल्यांदा घरात पाहिल्यावर काय होती विलासराव देशमुखांची प्रतिक्रिया? रितेशने सांगितला तो प्रसंग

SCROLL FOR NEXT