How to Turn On SOS Emergency on Your Phone esakal
विज्ञान-तंत्र

Emergency SOS Setting : संकटात देवदूताचे काम करेल SOS अलर्ट फीचर,तुमच्या मोबाईलमध्ये कसं सुरू कराल? एकदा बघाच

How to Enable SOS Emergency on iPhone and Android Devices in India : आपण पुरुष असो वा महिला एखाद्या गंभीर परिस्थितीत वेळीस हेल्पलाइन नंबरवर तात्काळ संपर्क करणे खूप महत्वाचे असते. iPhone आणि Android दोन्ही प्रकारच्या फोनमध्ये SOS अलर्ट फीचर असते.

Saisimran Ghashi

Emergency SOS Feature : तुमच्या स्मार्टफोनमध्ये एखाद्या संकटात कामाला येणारा SOS अलर्ट असतो हे तुम्हाला माहित आहे का? हे फीचर तुमचा जीव वाचवणारे तर आहेच पण गरजेच्या वेळी आपल्या जवळच्या लोकांशी संपर्क साधण्यासाठीही उपयुक्त आहे.

आपण पुरुष असो वा महिला, आपल्या सर्वांच्याच सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषतः एखाद्या गंभीर परिस्थितीत वेळीस हेल्पलाइन नंबरवर तात्काळ संपर्क करणे खूप महत्वाचे असते. iPhone आणि Android दोन्ही प्रकारच्या फोनमध्ये SOS अलर्ट फीचर असते. यामुळे आपण फोनद्वारे जलदगतीने मदत मिळवू शकता आणि आपल्या निवडलेल्या लोकांनाही कळवू शकता. तुम्ही हे फीचर कसे सक्रिय करू शकता आणि वापरू शकता ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

iPhone SOS अलर्ट फीचर कसे सक्रिय करायचे?

  • iPhone सेटिंग्ज अॅप उघडा.

  • खाली स्क्रोल करा आणि 'Emergency SOS' वर टॅप करा.

  • जर तुम्हाला SOS सुरू करताना तुमच्या iPhone ने आपोआप इमरजन्सी नंबरवर कॉल करायचा असेल तर 'Auto Call' चालू करा. विशेषतः जेव्हा तुम्ही स्वतः कॉल करू शकत नाही तेव्हा हे फीचर उपयुक्त आहे.

  • 'Set Up Emergency Contacts in Health' वर टॅप करा. तुमच्या SOS कॉल संपल्यानंतर तुमच्या लोकेशनसह मेसेज पाठवण्यासाठी आपत्कालीन संपर्क जोडा.

कोणत्या iPhone मध्ये SOS फीचर आहे?

  • iPhone 8 किंवा त्यापुढील व्हर्जन असलेल्या फोनमध्ये साइड बटन आणि व्हॉल्यूम बटन्सपैकी एक बटन सोबत दाबून धरा आणि Emergency SOS स्लाइडर येईपर्यंत सोडू नका.

  • आता इमरजन्सी सेवांना कॉल करण्यासाठी स्लाइडर ड्रॅग करा. जर Auto Call चालू असेल तर तुमचा iPhone काउंटडाउन संपल्यानंतर आपोआप इमरजन्सी सेवांना कॉल करेल.

  • iPhone 7 किंवा त्या आधीच्या व्हर्जन असलेल्या फोनमध्ये साइड किंवा टॉप बटन 5 वेळा जलद दाबा आणि Emergency SOS स्लाइडर चालू करा.

  • आता इमरजन्सी सेवांना कॉल करण्यासाठी स्लाइडर ड्रॅग करा.

Android SOS अलर्ट फीचर कसे सक्रिय करायचे?

Android फोनमध्येही SOS फीचर असते पण ते सक्रिय करण्याची पद्धत वेगवेगळ्या कंपनीच्या फोनवर थोडीशी वेगळी असू शकते.

  • तुमच्या Android फोनची सेटिंग्ज अॅप उघडा.

  • वरच्या सर्च बारमध्ये 'SOS' किंवा 'Emergency' टाईप करा.

  • जर तुमच्या फोनमध्ये हे फीचर असेल तर ते सर्च रिजल्टमध्ये दिसून येईल.

  • 'Emergency SOS' किंवा 'Emergency Assistance' वर टॅप करा आणि स्विच चालू करून फीचर सक्रिय करा.

SOS सुरू झाल्यावर तुम्हाला हवे ते अॅक्शन सेट करा. तुम्ही इमरजन्सी सेवांना कॉल करणे, लोकेशनसह इमरजन्सी कॉन्टॅक्टला मेसेज पाठवणे आणि गरजेनुसार छोटा व्हिडिओ किंवा साउंड क्लिप रेकॉर्ड करणे यासारख्या गोष्टी सेट करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT