how to Apply Online for Driving License from your smartphone check easy process
how to Apply Online for Driving License from your smartphone check easy process  
विज्ञान-तंत्र

घरी बसून फोनवर करा ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज, पाहा सोपी प्रोसेस

सकाळ डिजिटल टीम

How to Apply Online for Driving License : बाईक किंवा कार चालवायची असेल तर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे, जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तुम्हाला काळजीत पडण्याची गरज नाही. कारण ड्रायव्हिंग लायसन्स (DL) आता तुम्ही अगदी घरात निवांत बसून देखील मिळवू शकता. ते कसे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल, तर तुम्ही ज्या स्मार्टफोन किंवा डिव्हाइसमध्ये ही बातमी वाचत असाल त्याच फोनवरून तुम्ही त्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता, चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण प्रक्रिया…

लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज कसा करावा

  • तुमच्या स्मार्टफोनवर Google ब्राउझर उघडा

  • यानंतर परिवहन सारथी पोर्टलची साइट उघडा

  • यामध्ये तुमचे राज्य विचारले जाईल, यामध्ये तुम्ही तुमच्या राज्याचे नाव निवडा

  • त्यानंतर 'न्यू लर्नर लायसन्स' वर क्लिक करा

  • क्लिक करताच एक नवीन पेज उघडेल, येथे विचारलेले तपशील भरा

  • पत्ता, फोन नंबर इत्यादी माहिती भरा.

  • त्यानंतर फोटो आणि सहिची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल

  • सर्व तपशील भरल्यानंतर परीक्षेची तारीख निवडा

  • त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स फी भरा

  • ऑनलाइन प्रक्रियेनंतरही तुम्हाला चाचणीसाठी आरटीओमध्ये जावे लागते

  • ऑनलाइन चाचणीनंतर काही दिवसांनी तुम्ही वेबसाइटवरून तुमचे लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स डाउनलोड करता येईल

स्टेटस कसे जाणून घ्यावे

  • तुमच्या स्मार्टफोनवर ट्रान्सपोर्ट सारथी पोर्टल उघडा

  • ऑनलाइन सर्व्हिसेसवर जा आणि ड्रायव्हिंग लायसन्स सर्व्हिसेस आणि राज्य निवडा

  • Apply (Application Status) वर क्लिक करा.

  • त्यानंतर विचारलेली माहिती आणि कॅप्चा इंटर करा.

  • माहिती सबमिट करा, त्यानंतर तुम्हाला तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स स्टेटस दिसेल.

पर्मनंट ड्रायव्हिंग लायसन्स प्रक्रिया

  • लर्निंग झाल्यानंतर 30 ते 180 दिवसांच्या आत कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करा

  • कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स साठी मोबाईलवर सारथी पोर्टलवर लॉग इन करा

  • पोर्टलवर न्यू ड्रायव्हिंग लायसन्सवर क्लिक करा,

  • यानंतर एक नवीन पेज उघडेल, येथे तपशील भरा

  • त्यानंतर चाचणीसाठी तारीख निवडा

  • या प्रक्रियेनंतर फी भरा

  • नियोजित तारखेला आरटीओमध्ये जा आणि परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स टेस्ट द्या

  • ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यास ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्या घरी येईल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT