Steps to Find BSNL Coverage in Your Area and How to Port from Jio, Airtel, Vi to BSNL esakal
विज्ञान-तंत्र

BSNL Network Check : तुमच्या एरियामध्ये बीएसएनएल नेटवर्कचं टॉवर आहे काय? एका क्लिकवर जाणून घ्या

BSNL Network Port : बीएसएनएल नेटवर्कवर स्विच करण्यापूर्वी एक महत्त्वाचा प्रश्न पडतो, तो म्हणजे तुमच्या परिसरात बीएसएनएलचा टॉवर आहे का? अगदी काही सोप्या स्टेप्समध्ये जाणून घ्या.

Saisimran Ghashi

BSNL Network in Your Area : वेगवेगळ्या मोबाईल नेटवर्कचे मोबाइल रिचार्ज प्लॅन महाग झाल्याने ग्राहक वर्ग नाराज असल्याचे दिसून येत आहे. अश्यात ग्राहक वर्ग खासगी कंपन्यांऐवजी सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलकडे (BSNL) वळत आहेत. बीएसएनएलचे प्लॅन खूप स्वस्त असल्याने ग्राहकांचे आकर्षण वाढले आहे.

पण बीएसएनएल नेटवर्कवर स्विच करण्यापूर्वी एक महत्त्वाचा प्रश्न पडतो, तो म्हणजे तुमच्या परिसरात बीएसएनएलचा टॉवर आहे का? कारण बीएसएनएल नेटवर्कबद्दल अनेक गैरसमज देखील आहेत. जर तुम्हाला खाजगी कंपनीचे नेटवर्क नको असेल आणि कमी दरात बीएसएनएल नेटवर्क वापरायचे असल्यास ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

तुमच्या परिसरात बीएसएनएलचा टॉवर आहे का याची माहिती मिळवण्यासाठी अगदी काही सोप्या स्टेप्सनी तुम्ही माहिती मिळवू शकता.

टॉवरची माहिती कशी काढायची?

  • सरकारी वेबसाइटवर जा: https://tarangsanchar.gov.in/emfportal या वेबसाइटवर 'माय लोकेशन'वर क्लिक करा.

  • माहिती भरा: तुमचे नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाका.

  • ओटीपी मिळवा: तुमच्या ईमेलवर ओटीपी येईल, तो टाकताच एक मॅप उघडेल.

  • टॉवर शोधा: मॅपवर तुमच्या परिसरातील सेल फोन टॉवर दिसतील.

  • माहिती मिळवा: टॉवरवर क्लिक केल्यावर सिग्नल प्रकार (2G/3G/4G/5G) आणि ऑपरेटरची माहिती मिळेल.

जर तुमच्या परिसरात बीएसएनएलचा टॉवर असेल तर तुम्हाला चांगला नेटवर्क अनुभव मिळू शकता. पण टॉवर नसल्यास तुमच्यासाठी बीएसएनएल योग्य पर्याय ठरणार नाही.

खाजगी कंपनीचे ग्राहक असाल तर काय कराल?

जर तुम्ही Reliance Jio, Airtel किंवा Vodafone Idea उर्फ Vi कंपनीचे ग्राहक असाल आणि तुमचा नंबर बीएसएनएलवर पोर्ट करू इच्छित असाल तर त्या कंपन्यांच्या वेबसाइटवर पोर्टिंगची प्रक्रिया पाहू शकता.

जर तुम्ही खाजगी नेटवर्क कंपन्यांच्या रीचार्जमधील दरवाढीमुळे त्रस्त असाल तर बीएसएनएलकडे जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या परिसरातील बीएसएनएलची उपलब्धता तपासणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या मोबाईल नेटवर्कबद्दल योग्य निर्णय घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT