how to clear smartphone cookies cache
how to clear smartphone cookies cache Google
विज्ञान-तंत्र

फोन स्लो चालतोय? गुगल क्रोममधून Cookies, Cache करा क्लिअर

सकाळ डिजिटल टीम

स्मार्टफोन (Smartphone) आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे, त्यामुळे तुमचा स्मार्टफोन जर स्लो चालत असेल तर ती वैताग देणारी बाब ठरते. आपल्यापैकी बरेच जण स्मार्टफोन स्पीड कमी होण्याची समस्या अनुभवतात. पण स्मार्टफोन्स अचानक स्लो का चालतात? त्याच्यामागील कारण अगदी सोपं आहे, आपण जेव्हा इंटरनेटवर काहीतरी शोधतो आणि Android फोनचे वेब ब्राउझर App, Google Chrome, Mozilla Firefox हे तुम्हाला गुगल सर्च पटकन करता यावे यासाठी काही डेटा तुमच्या फोनमध्ये कॅशे आणि कुकीजच्या (cache and cookies) स्वरूपात साठवला जातो.

त्यामुळे काही दिवसांनंतर तुमचे डिव्हाइसमध्ये गरजेच्या नसलेल्या असंख्या फाइल्स जमा होतात. हा डेटा साठवला गेल्याने तुमचा स्मार्टफोन खूप स्लो होऊ शकतो. त्यासाठी तुमच्या कुकीज आणि कॅशे क्लिअर करणे हा सर्वोत्तम उपाय आहे, ज्यामुळे तुमचा फोनमध्ये अनावश्यक साठवलेला डेटा क्लिअर केला जाईल. आज आपण तुमच्या स्मार्टफोनमधून गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स वेब ब्राउझरवरील कॅशे आणि कुकीज कसे क्लिअर करावे याबद्दल जाणून घेणार आहोत.

गुगल क्रोम (Google Chrome)

- Google Chrome मध्ये, ब्राउझरच्या वरच्या उजव्या कोपर्‍यात दिलेल्या उभ्या तीन डॉट वर क्लिक करा.

- यानंतर History या ऑप्शनवर टॅप करा.

- फोनमधील कुकिज आणि कॅशे क्लिअर करण्यासाठी ब्राउझिंग डेटा क्लिअर करा हा ऑप्शन क्लिक करा.

- तुम्ही Chrome सेटिंग्समधून प्रायव्हसी आणि सेक्यिरिटी (Privacy and Security) ऑप्शनमधून देखील ब्राउझिंग डेटा क्लिअर करू शकता.

तुमचा Browsing History, कुकीज आणि साइट डेटा, कॅश्ड इमेज आणि फाइल्स क्लिअर करण्यासाठी बेसिक आणि अडव्हांस सेटिंग्ज Chrome मध्ये दिलेल्या असतात. तुम्ही तुमची सर्व डेटा क्लिअर करु इच्छिता की फक्त शेवटचे 24 तास किंवा चार आठवड्यांचा डेटा क्लिअर करायाचा आहे हे तुम्ही कॅटेगरी ड्रॉप-डाउन वापरून निवडू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही एडव्हांस ऑप्शनवर टॅप करून सेव्ह केलेले पासवर्ड, ऑटोफिल फॉर्म डेटा आणि साइट सेटिंग्ज देखील क्लिअर करु शकता. तुम्हाला काय क्लिअर करायचे आहे ते निवडल्यानंतर, क्लिअर डेटा आयकॉनवर क्लिक करा आणि ते तुम्हाला न विचारता डिलीट केले जाईल, त्यामुळे तुम्हाला नक्की काय क्लिअर करायचे आहे ते काळजीपूर्वक निवडा.

Mozilla Firefox

तुम्ही Google Chrome प्रमाणेच Mozilla Firefox Android अॅपमधून देखील कुकीज आणि कॅशे क्लिअर करू शकता.

त्यासाठी अॅड्रेस बारच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन उभ्या डॉट्स मेन्यूवर क्लिक करा.

- त्यानंतर सेटिंगमध्ये जा आणि ड्रॉप-डाउन मेनूमधून ब्राउझिंग डेटा क्लिअर करा हा ऑप्शन निवडा.

- फायरफॉक्समध्ये तुम्हाला क्लिअर ब्राउझिंग डेटामध्ये अनेक ऑप्शन देते, यामधून तुम्हाला कुकीज, कॅश्ड फोटो आणि फाइल्स या व्यतिरिक्त ओपन टॅब, तुमची ब्राउझिंग History आणि साइट डेटा (Site Data), साइट परमीशन्स (permissions) आणि अगदी तुमचे डाउनलोड फोल्डर देखील डिलीट करता येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT: सीएसएमटी स्थानकात लोकल रुळावरुन घसरली; सलग दुसरी घटना घडल्यानं खळबळ

Shashi Tharoor T20 WC 2024 : माझा मतदारसंघ करणार वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व.... शशी थरूर भारतीय संघाची घोषणा होताच हे काय म्हणाले?

Poorest Politicians: भारतातील सर्वात गरीब 'पुढारी' कोण आहेत? ज्यांच्याकडे आहे फक्त 1,700 रुपयांची मालमत्ता

Latest Marathi News Live Update: उद्धव ठाकरेंची विकेट आधीच पडलीए, ते क्लीनबोल्ड झालेत; CM शिंदेंना विश्वास

Rupali Ganguly: वेट्रेस म्हणून केलं काम, गाजवला छोटा पडदा अन् आता भाजपमध्ये प्रवेश; जाणून घ्या अनुपमा फेम रुपाली गांगुलींबद्दल

SCROLL FOR NEXT