What is digital detox know benefits esakal
विज्ञान-तंत्र

Digital Detox : लाँग विकेंडच्या सुट्टीचा प्लॅन करताय? एकदा करून पाहाच डिजिटल डिटॉक्स,फायदे जाणून व्हाल शॉक

Digital Detox Tips : आता जर तुम्ही लाँग विकेंडच्या सुट्टीचा प्लॅन बनवत असाल तर डिजिटल डिटॉक्स तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे.

Saisimran Ghashi

Tech Tips : आजच्या काळात आपण सगळेच स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅब्लेट्स आणि इतर डिजिटल वस्तूंवर अवलंबून आहोत. आपण दिवसभर या उपकरणांचा वापर करत असतो. यामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. पण कधी विचार केला आहे का, या डिजिटल जगातून काही काळासाठी दूर राहिले तर काय होईल?

डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय?

आता जर तुम्ही लाँग विकेंडच्या सुट्टीचा प्लॅन बनवत असाल तर डिजिटल डिटॉक्स हा तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे.डिजिटल डिटॉक्स म्हणजे या सर्व डिजिटल वस्तूंपासून काही काळासाठी पूर्णपणे दूर राहणे.

डिजिटल डिटॉक्स का करावे?

सततच्या नॉटिफिकेशन, ईमेल आणि सोशल मीडिया अपडेट्समुळे आपण तणावात राहतो. डिजिटल डिटॉक्समुळे आपल्याला विश्रांती मिळते आणि तणाव कमी होतो. रात्री उशिरापर्यंत फोन वापरण्यामुळे झोप चांगली लागत नाही. डिजिटल डिटॉक्समुळे आपली झोप सुधारते.

सतत विचलित होण्यामुळे आपली उत्पादकता कमी होते. डिजिटल डिटॉक्समुळे आपण एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतो आणि आपली उत्पादकता वाढू शकते.सततच्या डिजिटल उत्तेजनामुळे आपली सर्जनशीलता मंदावते. डिजिटल डिटॉक्समुळे आपल्याला नवीन विचार येण्यासाठी आणि सर्जनशील होण्यासाठी वेळ मिळतो.

सततच्या स्क्रीन टाइममुळे आपल्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होतो. डिजिटल डिटॉक्समुळे आपले मानसिक आरोग्य सुधारते. डिजिटल उपकरणांमुळे आपण आपल्या जवळच्या लोकांशी प्रत्यक्षात कमी वेळ घालवतो. डिजिटल डिटॉक्समुळे आपल्याला त्यांच्यासोबत अधिक वेळ घालवता येतो.

डिजिटल डिटॉक्स कसे करावे?

  • सर्व अॅप्सच्या नोटिफिकेशन्स बंद करा.

  • फोन सायलेंट मोडवर ठेवा किंवा विमान प्रवास मोडवर ठेवा.

  • काही काळासाठी सोशल मीडिया वापर बंद करा.

  • पुस्तक वाचणे ही डिजिटल डिटॉक्सची एक चांगली पद्धत आहे.

  • बाहेर फिरण्या जा जसे की लॉन्ग विकेंड हॉलिडे आणि नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घ्या.

  • कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवा.त्यांच्यासोबत गप्पा मारा, खेळा किंवा कोणतीही इतर गोष्टी करा.

  • चित्रकला, संगीत वाजवणे किंवा इतर कोणतेही काम करा.

  • योग किंवा ध्यान करा. यामुळे आपला मन शांत होईल.

डिजिटल डिटॉक्सचे फायदे

  • डिजिटल डिटॉक्समुळे तणाव कमी होतो. झोप सुधारते.

  • एखाद्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करता येते आणि उत्पादकता वाढते.

  • सर्जनशीलता वाढते.मानसिक आरोग्य सुधारते.

  • आपल्या जवळच्या लोकांशी नाते जोडता येते.

  • आपल्याला स्वतःबद्दल अधिक जाणून घेण्याची संधी मिळते.

लक्षात ठेवा की सर्वात महत्वाचे म्हणजे संतुलन साधणे. तुमच्यासाठी काय योग्य आहे ते ठरवा आणि या लॉन्ग विकेंड सुट्टीचा आस्वाद घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT