how to do payment without internet connection and activate paytm tap to pay feature on phone
how to do payment without internet connection and activate paytm tap to pay feature on phone  Sakal
विज्ञान-तंत्र

Paytm वरून इंटरनेटशिवाय करा पेमेंट, 'असे' सुरु करा 'टॅप टू पे' फीचर

सकाळ डिजिटल टीम

Paytm Tap To Pay Feature : आपल्या App वरून पेमेंट करणे सोपे बनण्यासाठी Paytm कंपनीने एक नवीन सेवा सुरू केली आहे. ही एक व्हर्च्युअल कार्ड 'टॅप टू पे' (Tap To Pay) सर्व्हिस असून ही पेटीएम पेमेंट सर्व्हिस वापरुन वापरकर्त्यांना त्यांच्या पीओएस मशीनवर फोन टॅप करून आणि त्यांच्या Paytm रजिस्टर्ड कार्डने इंस्टंट पेमेंट करता येते. चला याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

आता तुम्ही म्हणाल की यात कोणती मोठी गोष्ट आहे, तर कंपनीने इंटरनेटशिवाय पेटीएम पेमेंट करता येणार आहे. फोन लॉक केलेला असला किंवा मोबाईल डेटा नसला किंवा कोणत्याही प्रकारचे इंटरनेट कनेक्शन नसले तरीही पेटीएम टॅप टू पे सर्व्हिल काम करेल . ही सेवा आयफोन आणि अँड्रॉइड दोन्ही वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. पेमेंट करण्यासाठी कोणीही ऑल-इन-वन PoS डिव्हाइसेस आणि इतर बँकांच्या PoS मशीनवर देखील तुम्ही पेमेंट करु शकता.दरम्यान NFC द्वारे पेमेंट करणारी पेटीएम सेवा सध्या अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. iOS वापरकर्ते याचा लाभ घेऊ शकणार नाहीत

Paytm टॅप टू पे कसे वापरावे:

यासाठी तुम्हाला प्रथम पेटीएम App ओपन करावे लागेल. App उघडण्यापूर्वी, तुम्ही तुम्ही Google Play Store वरुन त्याची लेटेस्ट आवृत्तीवर अपडेट करणे आवश्यक आहे. नवीन आवृत्तीमध्येच, तुम्हाला टॅप टू पे फीचर दिसेल.

App उघडल्यानंतर, तुम्हाला टॅप टू पे निवडावे लागेल. यानंतर तुम्हाला Add New Card चा पर्याय निवडावा लागेल. तुम्हाला हे स्क्रीनच्या तळाशी मिळेल. जर तुम्ही आधीच कार्ड सेव्ह केले असेल तर तुम्ही ही पायरी वगळू शकता.

त्यानंतर तुम्हाला Proceed to Verify Card वर टॅप करावे लागेल. तुमच्या फोनवर वन टाईम पासवर्ड येईल. ते एंटर करा आणि टॅप टू पे फीचर सुरु करा.

टॅप टू पे फीचर वापरण्यासाठी तुमच्या फोनमध्ये NFC चालू असणे आवश्यक आहे. यामध्ये ट्राजेक्शनची मर्यादा 5000 रुपये आहे. 5 हजार रुपयांपेक्षा जास्त व्यवहार झाला असेल तर तुम्हाला पीओएस मशीनवर पिन टाकावा लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT