iOS 26 Update iPhone Download Process esakal
विज्ञान-तंत्र

iOS 26 Download : आयफोनमध्ये अ‍ॅपलचे iOS 26 अपडेट डाउनलोड करा एका क्लिकवर..

iOS 26 Update iPhone Download Process : अ‍ॅपलने iOS 26 चा पहिला डेव्हलपर बीटा अपडेट लाँच केला आहे, ज्यामध्ये नवीन Liquid Glass डिझाइन आणि AI फिचर्स आहेत.

Saisimran Ghashi

iOS 26 Download : अ‍ॅपलने नुकतीच WWDC 2025 मध्ये जाहीर केलेल्या iOS 26 चा पहिला डेव्हलपर बीटा अपडेट अधिकृतपणे लाँच केला आहे. हा अपडेट iPhone वापरकर्त्यांसाठी एक नवीन अनुभव घेऊन येतो ज्यात Apple च्या खास "Liquid Glass" नावाच्या नवीन डिझाइनचा समावेश आहे. या अद्भुत आणि पारदर्शक डिझाइनमुळे iPhone चा इंटरफेस खूपच आकर्षक आणि आधुनिक दिसतो.

iOS 26 चा सर्वात मोठा बदल म्हणजे या नवीन लिक्विड ग्लास डिझाइनमुळे आपले अ‍ॅप्स आणि मेन्य पारदर्शक दिसतात. याशिवाय, या अपडेटमध्ये अनेक AI आधारित फिचर्सदेखील आहेत, जसे की Messages आणि FaceTime मध्ये लाईव्ह ट्रान्सलेशन, स्मार्ट कॉल स्क्रीनिंग, तसेच "Hold Assist" जी कॉल होल्डवर असताना आपल्यासाठी वाट पाहते.

अ‍ॅपलने यंदा iOS 18 नंतर थेट iOS 26 लाँच करून आपले सॉफ्टवेअर व्हर्जनिंग थोडे वेगळे केले आहे. हे एक संकेत आहे की हा अपडेट फक्त एक रूटीन अपडेट नाही, तर अनेक महत्त्वाचे बदल आणि नव्या तंत्रज्ञानाची सुरुवात आहे.

कोण कोणी iOS 26 अपडेट वापरू शकतो?


iPhone 11 किंवा त्यानंतरच्या सर्व मॉडेल्सवर iOS 26 डेव्हलपर बीटा अपडेट इंस्टॉल करता येईल. मात्र अ‍ॅपलच्या पूर्ण AI फिचर्सचा फायदा घेण्यासाठी iPhone 15 Pro, 15 Pro Max, 16 Pro मॉडेल्स किंवा येणाऱ्या iPhone 17 मॉडेल्सची गरज आहे.

iOS 26 डेव्हलपर बीटा कसा डाउनलोड आणि इंस्टॉल करायचा?

  • पहिला आपल्या iPhone वर Apple Developer साइटवर लॉगिन करा.

  • नंतर Settings > Privacy & Security मध्ये जाऊन Developer Mode ऑन करा.

  • Settings > General > Software Update > Beta Updates मध्ये जाऊन "iOS 26 Developer Beta" निवडा.

  • "Download and Install" वर टॅप करा आणि पुढील सूचना पाळा.

अपडेट करण्यापूर्वी लक्षात ठेवा

  • फक्त iPhone 11 आणि त्यानंतरच्या मॉडेल्सवर हा बीटा अपडेट काम करेल.

  • तुमचा फोन iOS 18.5 किंवा त्याहून अधिक नवीनतम स्थिर अपडेटवर असावा.

  • किमान 15GB रिकामी जागा असणे आवश्यक आहे.

  • अपडेटपूर्वी तुमचा डेटा पूर्णपणे बॅकअप करावा कारण बीटा अपडेटमध्ये काही बग्स आणि अ‍ॅप क्रॅशेस होऊ शकतात.

iOS 26 साठी सुसंगत iPhone मॉडेल्स


iPhone 11, 11 Pro, 11 Pro Max, iPhone 12, 13, SE 2nd Gen, 14, 15, 15 Plus, 15 Pro, 15 Pro Max, 16 सिरीज, आणि येणाऱ्या iPhone 17 सिरीज.
iOS 26 हा iPhone वापरकर्त्यांसाठी एक मोठा पाऊल आहे ज्यामध्ये स्टाईल आणि स्मार्ट AI फिचर्स दोन्हींचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT