Voter ID Download eSakal
विज्ञान-तंत्र

Voter ID Download : घरबसल्या डाऊनलोड करता येईल मतदान ओळखपत्र; सायबर कॅफेमध्ये जाण्याची गरज नाही.. वाचा कसं?

Download Digital Voter ID : कित्येक वेळा साध्या-सोप्या ऑनलाईन कामांसाठी आपण सायबर कॅफेमध्ये जातो, आणि तिथे पाच-पन्नास रुपये द्यावे लागतात.

Sudesh

Download Voter ID Card : सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलं आहे. देशातील कित्येक तरुण यंदा पहिल्यांदा मतदान करणार आहेत. तुम्हीदेखील यांपैकीच एक असाल, आणि अजून आपलं मतदान कार्ड तुम्ही डाऊनलोड केलं नसेल; तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

कित्येक वेळा साध्या-सोप्या ऑनलाईन कामांसाठी आपण सायबर कॅफेमध्ये जातो, आणि तिथे पाच-पन्नास रुपये द्यावे लागतात. मात्र, आता तुम्ही स्वतःच आपलं मतदान ओळखपत्र कार्ड (डिजिटल e-EPIC कॉपी) डाऊनलोड करू शकणार आहात. यासाठी अगदी सोपी पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

असं करा डाऊनलोड

Voter ID Card डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी भारतीय निवडणूक आयोगाच्या मुख्य वेबसाईटला भेट द्यावी लागेल. https://voterportal.eci.gov.in/ किंवा https://old.eci.gov.in/e-epic/ या दोन्हींपैकी एका वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता. तसंच तुम्हाला NVPS पोर्टलवर आपलं अकाउंट तयार करावं लागेल. (How to download Voter ID)

  • आपल्या अकाउंटला लॉगइन केल्यानंतर तुम्हाला आपला इलेक्शन फोटो आयडेंटिटी कार्ड (EPIC) नंबर एंटर करायचा आहे. सोबतच फॉर्म रेफ्रन्स नंबर एंटर करून आपलं राज्य निवडायचं आहे.

  • यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी एंटर केल्यानंतर तुमचं व्होटर आयडी कार्ड डाऊनलोड करण्यासाठी स्क्रीनवर पर्याय दिसेल.

  • Download e-EPIC या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या व्होटर कार्डची PDF फाईल डाऊनलोड होईल.

  • हे व्होटर आयडी तुम्ही PDF फॉरमॅटमध्ये सेव्ह करुन ठेऊ शकता, किंवा डिजिलॉकरला देखील अपलोड करून ठेऊ शकता.

असं करा अप्लाय

तुमचं वय जर 18 वर्षे पूर्ण असेल, किंवा तुम्ही पुढील काही दिवसांमध्ये 18 वर्षांचे होणार असाल; तर तुम्ही फॉर्म 6 भरुन मतदान कार्ड मिळवण्यासाठी आपलं नाव नोंदवू शकता. यासाठी देखील व्होटर पोर्टलवर जावं लागेल. याठिकाणी पहिलाच पर्याय तुम्हाला 'Fill Form 6' असा दिसेल. यावर क्लिक करून, आवश्यक ती माहिती भरून तुम्ही आपलं व्होटर आयडी तयार करून घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT