Download Instagram Reels Without Third-Party Apps esakal
विज्ञान-तंत्र

Instagram Tricks : हवी ती रील डायरेक्ट गॅलरीत होणार डाउनलोड ; कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपविना इंस्टाग्रामवर वापरा 'ही' स्मार्ट ट्रिक

Reel Download Trick : इन्स्टाग्रामवर रील्स बघताना एखादी रील आवडली आणि आताती डाउनलोड करायची आहे. परंतु थर्ड पार्टी अ‍ॅप वापरण्याची इच्छा नसेल तर थेट इन्स्टाग्रामवरुन रील्स डाउनलोड करण्यासाठी सोपी ट्रिक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Saisimran Ghashi

Instagram Tips : इन्स्टाग्राम आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाचा सोबत झाला आहे. वेगवेगळे रील्स पाहणे,बनवणे आणि व्हायरल होते लोकांना खूप आवडू लागले आहे. अश्यात इन्स्टाग्रामवर रील्स बघताना एखादी रील आवडली आणि आताती डाउनलोड करायची आहे. परंतु थर्ड पार्टी अ‍ॅप वापरण्याची इच्छा नाही? मग टेंशन कशाला? थेट इन्स्टाग्रामवरुन रील्स डाउनलोड करण्यासाठी सोपी ट्रिक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

इन्स्टाग्रामवर रील्स ही जबरदस्त सुविधा आहे जिथे तुम्ही छोटे व्हिडीओ बनवू शकता, पाहू शकता आणि शेअर करू शकता. हे व्हिडीओ मनोरंजक, आकर्षक आणि माहितीपूर्ण देखील असू शकतात. तुम्ही ही रील्स तुमच्या मित्रांना किंवा कुटुंबियाना शेअर करू शकता किंवा इन्स्टाग्रामच्या बुकमार्क फोल्डरमध्ये सेव्ह करू शकता. पण, थेट डाउनलोड करण्याचा पर्याय नाही.

काही लोक थर्ड पार्टी अ‍ॅप वापरुन रील्स डाउनलोड करतात. पण या अ‍ॅप विश्वासार्ह नसून तुमच्या फोनच्या सुरक्षतेसाठी धोकादायक ठरू शकतात. मग रील्स सुरक्षितपणे कशी डाउनलोड करायची? तर इन्स्टाग्रामवरुन थेट डाउनलोड करण्यासाठी काही सोप्या ट्रिक आहेत.

तुमच्या Android आणि iPhone वर रील्स डाउनलोड करण्याचे मार्ग

स्टोरीमध्ये अॅड करा आणि मग जतन करा.

इन्स्टाग्राम उघडा आणि डाउनलोड करायची रील्स शोधा.

स्क्रीनच्या डाव्या बाजूला असलेल्या 'शेअर' बटणवर टॅप करा.

खाली स्क्रोल करा आणि 'स्टोरीमध्ये जोडा' निवडा.

आता व्हिडीओ तुमच्या स्टोरीमध्ये बसवून घ्या.

टॉप राइटला असलेल्या 'थ्री-डॉट' बटणवर टॅप करा आणि 'सेव्ह' निवडा.

रील्स आता तुमच्या फोनच्या गॅलरीमध्ये जतन होईल.

बुकमार्क करा आणि नंतर कधीही पहा

जर रील्स डाउनलोड करायची नसून फक्त नंतर पाहण्यासाठी जतन करायची असेल तर 'बुकमार्क' पर्याय वापरा.

रील्स उघडा आणि स्क्रीनच्या टॉप राइटला असलेल्या 'थ्री-डॉट' बटणवर टॅप करा. 'सेव्ह' निवडा.

तुमच्या प्रोफाइलवर जा आणि टॉप राइटला असलेल्या 'हॅम्बर्गर मेन्यू' (तीन आडव्या रेषा) वर टॅप करा.

'Saved' निवडा आणि तेथे तुमच्या जतन केलेल्या रील्स दिसतील.

आता रील्सचा मजा घ्या आणि थर्ड पार्टी app पासून दूर रहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT